How To Reduce Joint Pain In Winter : हिवाळा सुरू होताच हात-पायांचे सांधे कडक होऊ लागतात; पाय, गुडघे, कंबर आणि इतर सांध्यांमध्ये वेदना वाढू लागतात. तापमान कमी झाल्यावर शरीराच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात; ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळेच सांध्यांमध्ये सूज आणि वेदना जाणवू लागतात. त्याशिवाय लोक थंडीत त्यांच्या शारीरिक हालचाली कमी करतात आणि त्यामुळे स्नायू कमकुवत होतात. संधिवात, पाठदुखी व गुडघेदुखी यांसारख्या समस्या आणखी वाढतात. ही समस्या वृद्धांमध्ये अधिक प्रमाणात दिसून यायची; पण आजकाल तरुणांनाही या वेदनांचा त्रास जास्त जाणवतो आहे.
तर हिवाळ्यात कोणत्या गोष्टीच्या कमतरतेमुळे सांधेदुखी, कडकपणा आणि सूज येते?
हिवाळ्यात सांधे आणि हाडे दुखण्याची करणे
हिवाळ्यात शरीराच्या रक्तवाहिन्या उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आकुंचन पावतात. यामुळे स्नायू, सांध्यामध्ये रक्त प्रवाह कमी होतो; ज्यामुळे कडकपणा, वेदना आणि लवचिकता कमी होते. थंडीच्या काळात लोक सामान्यतः त्यांच्या शारीरिक हालचाली कमी करतात. यामुळे स्नायू कमकुवत होतात, ऑस्टियोआर्थरायटिस, पाठदुखी, खांद्यांची हालचाल करताना वेदना होणे यांसारख्या समस्या वाढतात.
तर हिवाळ्यात कोणत्या गोष्टीच्या कमतरतेमुळे सांधेदुखी, कडकपणा आणि सूज येते?
हिवाळ्यात सांधे आणि हाडे दुखण्याची करणे…
- हिवाळ्यात थंडीपासून शरीराचं रक्षण करण्यासाठी रक्तवाहिन्या थोड्या आकुंचन पावतात. त्यामुळे स्नायू, सांध्यांमधील रक्तप्रवाह कमी होतो; ज्यामुळे कडकपणा, वेदना व लवचिकता कमी होते.
- थंडीच्या काळात लोक सामान्यतः त्यांच्या शारीरिक हालचाली कमी करतात. त्त्यामुळे स्नायू कमकुवत होतात, ऑस्टिओआर्थरायटिस, पाठदुखी, खांद्यांची हालचाल करताना वेदना होणे यांसारख्या समस्या वाढतात.
हिवाळ्यात सांधेदुखीपासून स्वतःची काळजी कशी घ्याल?
शरीर उबदार ठेवा – जर तुम्हाला हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास होत असेल, तर तुमच्या सांध्यांना थंडीपासून वाचवा. सांधे कडक होतात, तेव्हा त्यांना उबदार ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे गरम कपडे घाला, थंड हवेत बसणे टाळा, झोपताना किंवा विश्रांती घेताना उबदार ब्लँकेट वापरा. त्यासाठी खोली उबदार ठेवा. मोजे, हातमोजे यांसारख्या छोट्या छोट्या गोष्टीदेखील सांध्यांना आराम देऊ शकतात.
हलका व्यायाम करा – हलका व्यायामही सांध्यांसाठी औषधासारखे काम करतो. योगासने, चालणे, पोहणे, सायकलिंग करणे यांसारखे व्यायाम रक्तप्रवाह वाढवतात, लवचिकता सुधारतात. बाहेर पडण्यापूर्वी घरातच हलका वॉर्म-अप करा, स्ट्रेचिंग, योगा केल्याने सकाळी सांध्यांचा कडकपणा कमी होऊ शकतो. जास्त वेळ एकाच स्थितीत बसू नये. त्यासाठी आवश्यक ती काळजी घ्या.
हाडे आणि सांध्यांसाठी निरोगी आहार – तुमच्या आहारात व्हिटॅमिन डी, कॅल्शियम व ओमेगा-३ फॅटी ॲसिड असलेले पदार्थ समाविष्ट करा. हे पोषक घटक हाडे, सांधे मजबूत करण्यास मदत करतात. दूध, दही, चीज, हिरव्या भाज्या, काजू, मासे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. जर तुमच्या शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घेणे उपयुक्त ठरू शकते.
हायड्रेट राहा – यामुळे सांध्यांमध्ये लुब्रिकेशन (घर्षण कमी) टिकून राहते आणि सूज कमी होते. पुरेसे पाणी प्याल्याने शरीर हायड्रेट राहते. त्यामुळे सांधेदुखी कमी होण्यास मदत होते आणि त्वचा निरोगी राहते.
गरम पाणी – थंडीत स्नायू आणि सांधे कडक झाले, तर त्यांना गरम पाण्याने आराम मिळू शकतो. हीटिंग पॅड, गरम पाण्याने अंघोळ केल्याने जडपणा कमी होतो. हीट थेरपीमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराची लवचिकता वाढते. दीर्घकाळ चालणे आर्थरायटिस आणि पाठीच्या दुखण्यामध्ये (क्रॉनिक बॅक पेन) खूप उपयोगी असते. हे करताना तापमानाचे नीट भान ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.
बसण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या – हिवाळ्यात लोक शरीर आकसून बसतात, ज्यामुळे कालांतराने पाठीचा कणा, मान, कंबरेवर दबाव येतो. म्हणून सरळ बसा, पाठीचा आधार घ्या आणि जास्त वेळ पाय मांडी घालून बसणे टाळा. घरून काम करताना एर्गोनोमिक फर्निचर वापरा.
जुन्या जखमांची काळजी घ्या – जर तुम्हाला अगोदर अस्थिभंग, गुडघ्याचा अस्थिबंध (लिगामेंट) किंवा शस्त्रक्रिया झाली असेल, तर थंडीमुळे त्या भागात सौम्य वेदना किंवा कडकपणा येऊ शकतो. त्यामुळे यासाठी व्यायाम, शारीरिक उपचार करणे फायदेशीर आहे.
शरीर ॲक्टिव्ह ठेवा – थंडीमध्ये सकाळी शरीर जड वाटते. हलके स्ट्रेचिंग, योगा आणि गरम पाण्याने आंघोळ केल्याने जड स्नायूंना आराम मिळतो. त्यामुळे दिवसभर हालचाल करणे सोपे जाते.
