उन्हाळा आला की डासांचं प्रमाणं वाढू लागतं. डास चावल्याने डेंग्यू, मलेरिया किंवा चिकनगुनिया होऊ शकतो. तुमच्या घरात किंवा मित्रमैत्रिणींपैकी डास चावण्याची एखाद्याची तक्रार जास्त असते, असं निरीक्षण नोंदवलं असेल, तर ते खरंय. कारण डास सर्वांनाच चावतात, असं नाही. नर डास कोणालाच चावत नाही केवळ मादी डास चावते. आता ही मादी डास कोणाला चावायचं हे, कसं ठरवते माहितीये का?. जाणून घेऊया सविस्तर…

मादी डास कोणाला चावायचं हे, कसं ठरवते? या प्रश्नाचे उत्तर एका संशोधनात मिळाले आहे. संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, मादी डासांना आपले भक्ष्य शोधण्यासाठी वास आणि दृष्टी या दोन्हींची आवश्यकता असते. आपण कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतो, त्याला एक विशिष्ट प्रकारचा गंध, वास असतो. मादी डास हा वास घेते आणि माणसाच्या जवळ पोहोचते आणि मग ती आपली दृष्टी वापरून त्यांना चावते.

झी न्यूज हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांनी सांगितले की, मादी डासांमध्ये १०० फूट अंतरावरून वास घेण्याची क्षमता असते. एका सेकंदात आपण जेवढा श्वास सोडतो, त्यामध्ये ५% कार्बन डायऑक्साइड असते. त्याचा वास आल्यावर मादी डास वेगाने माणसाकडे उडत जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तज्ज्ञांच्या मते, मादी डास आपल्याला शोधू शकतात, याचं कारण म्हणजे ते मानवी वासाचे वेगवेगळे घटक ओळखण्यास सक्षम असतात. या वासांच्या साहाय्याने डास जेव्हा आपल्या जवळ येतात, तेव्हा त्यांना आपल्या शरीरातील उष्णतेने आपला ठावठिकाणा कळतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, मादी डासांमध्ये वास घेण्याची क्षमता संपुष्टात आली तर ते आपल्याला चावू शकणार नाही आणि आपला बचाव होऊ शकतो.