How to Make Denims Last Longer: पूर्वी फक्त वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांकडे जीन्सचा वापर असायचा पण आता इंडो वेस्टर्न लुकमध्येही जीन्स थोडक्यात डेनिम्सचे कपडे मस्त स्टाईल करता येतात. जीन्सचा एकूणच वापर वाढत असताना त्याचा टिकाऊपणा थोडा कमी होऊ लागला आहे. पूर्वी दोन- तीन वर्षे टिकणाऱ्या जीन्स आता अगदी सहा महिन्यातच जीर्ण होतात परिणामी त्यांना फेकून देण्याशिवाय पर्याय उरत नाही. तुम्हाला जर या डेनिम्सचं आयुष्य वाढवायचं असेल तर आज त्यासाठी आम्ही जीन्स धुण्याबाबतच्या महत्त्वाच्या टीप्स आपल्यासह शेअर करणार आहोत.

जीन्स किती वेळा धुवावी? (How Many Times You Should Wash Your Jeans)

फॅशन स्टायलिस्ट ईशा भन्साळी यांनी शेअर केले की तुम्ही प्रत्येक वापरानंतर जीन्स धुण्याची गरज नाही. डेनिमचे फॅब्रिक हे मुळातच टिकाऊ असतं. त्यामुळे कपड्यांवर धूळ, डाग किंवा घाण नसल्यास शक्यतो सात वेळा जीन्स घातल्याशिवाय धुण्याची गरज नाही. डेनिम्स धुण्यासाठी साधं डिटर्जंट वापरावं. हा नियम अर्थातच कॉमन जीन्सला लागू होतो. कारण रिप्ड आणि ऍसिड वॉश जीन्स रसायने वापरून तयार केलेल्या असतात, जीर्ण दिसणे हीच त्या जीन्सची ओळख असते त्यामुळे या जीन्स जास्त धुतल्या तरी हरकत नाही.”

जीन्सचा रंग टिकवून ठेवण्यासाठी..

सेलिब्रिटी स्टायलिस्ट जान्हवी पल्ली सांगतात की, जीन्सच्या कपड्याचा टिकाऊपणा व रंग टिकवण्यासाठी आपण सामान्यत: तीन ते दहा वेळा घातल्यावर धुवू शकता. जर वारंवार धुण्याचा त्रास नको असेल तर आपण जीन्स वापरल्यावर त्या हवेशीर ठिकाणी ठेवून वाळवू शकता. मुंबईसारख्या उष्ण, दमट वातावरणात मात्र तीन ते पाच वेळा वापरल्यावर आपण जीन्स धुवायलाच हवी.

पल्लीचा सांगतात की, रंग आणि फॅब्रिक टिकवून ठेवण्यासाठी जीन्स धुताना सुद्धा काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जसे की, जीन्स नेहमी उलट करून धुवावी व धुण्यासाठी पाणी थंड असावं. कापड लगेच जीर्ण होऊ नये यासाठी साधं सौम्य डिटर्जंट वापरावं. हे डिटर्जंट धूळ व दुर्गंध काढून टाकण्यासाठी पुरेसे ठरू शकते. फॅब्रिक कंडिशनरचा वापर कमी प्रमाणात करावा,कारण हे कंडिशनर्स किंवा सॉफ्टनर्स डेनिमला मऊ करून लगेच जीर्ण करू शकतात.

हे ही वाचा<< तुमच्या शरीराला ‘इतकी’ ग्रॅम साखर आवश्यक! यापेक्षा जास्त खाल्ल्यावर ही साखर शरीरात कुठे जाते, काय बदलते? पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जीन्स स्टोअर कशी करावी?

लक्षात ठेवण्याची आणखी एक गोष्ट म्हणजे भलेही तुम्ही जीन्स वारंवार धूत नसाल पण तुम्ही ती स्टोअर करताना काळजी घेणे आवश्यक आहे. जीन्सवर अतिजड वस्तू ठेवू नका, तारांवर किंवा तुटलेल्या, गंजलेल्या हँगर्सवर जीन्स वाळत घालू नका अन्यथा यामुळे जीन्सवर डाग पडू शकतात. शक्यतो लाकडी हँगर्सचा वापर करावा. शक्य तितक्यांदा आपण जीन्स वाळवण्यावर भर द्या पण स्टोअर करताना आर्द्रता नसलेल्या थंड जागी ठेवा.