Maggi Side Effects : मॅगी हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. दोन मिनिटांमध्ये बनणारी मॅगी खायला खूप टेस्टी असते. तुम्ही किंवा तुमची मुलं मॅगीप्रेमी असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दोन मिनिटांची मॅगी पचायला किती वेळ लागतो, तुम्हाला माहिती आहे का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

मॅगी असो की नूडल्स खायला सर्वांना आवडते. मॅगी आणि नूडल्स खाल्ल्यानंतर आपले पोट तृप्त होते, पण तुम्हाला यांचे साईड इफेक्ट्स माहिती आहे का? मॅगी किंवा नूडल्स रिफाइंड फ्लोरपासून बनते, त्यामुळे पचायला अवघड जाते.
एक पॅकेट मॅगीमध्ये जवळपास ३८५ कॅलरी असतात, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. हेच ३८५ कॅलरी बर्न करण्यासाठी जवळपास अर्धा तास कठीण वर्कआउट करावा लागतो. एक पॅकेट मॅगीमध्ये १४.६ फॅट असते आणि ३.४ शुगर असते.

हेही वाचा : प्रत्येकवेळी जोडीदार देतो का घटस्फोटाची धमकी? मग ‘या’ गोष्टी आवर्जून करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • हेल्थ एक्सपर्टनुसार, जर एखादा व्यक्ती नियमित नूडल्स किंवा मॅगी खात असेल तर त्याला आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात.
  • अति प्रमाणात मॅगी किंवा नूडल्सच्या सेवनामुळे सांधेदुखी, स्मरणशक्तीची समस्या आणि IQ लेव्हल कमी होण्याची शक्यता असते.
  • याशिवाय काही रिपोर्टनुसार लवकरात लवकर शिजणाऱ्या नूडल्समध्ये शिसाचे प्रमाण असल्याचे सांगितले आहे. शिसे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले नसते. यामुळे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होण्याची शक्यता वाढते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)