Kitchen Jugaad: काही तासांचं काम काही मिनिटांमध्ये करणं आणि जास्त काम न वाढवता कुकिंग करण्यासाठी काही किचन हॅक्स शिकून घेणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या काळात गृहिणींना स्वयंपाकाच्या कामात मदत म्हणून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं उपलब्ध आहेत. मात्र, किचनमधील काही देशी जुगाड असे असतात जे या सगळ्या उपकरणांना मागे टाकतात. काही साध्या सोप्या ट्रिक्सने स्वयंपाकाचा वेळ आणि आपला त्रास दोन्ही वाचू शकतो.

अशाच एका किचन जुगाडबद्दल तुम्हाला सांगणार आहे. बटाटे आणि अंडी सोलणं यामध्ये बराच वेळ जातो. एवढंच नाही तर अंडी उकडवताना जर ती पाण्यात फुटली त्याने आणखी त्रास होतो. मग यावर उपाय काय, याचं सोल्यूशन अनेक जणांना ठाऊक नसेलच. अंडी उकडवताना लिंबूचा एखादा तुकडा त्यात टाकला, तर तुमचं काम सोपं होऊन जाईल. शिवाय, लिंबी टाकण्याचा केवळ एकच उपाय नाही, तर पाच पाच फायदे आहेत.

हा एक असा जुगाड आहे जो बघायला साधासुधा वाटतो, पण आहे खूपच फायदेशीर. बरेच लोक बटाटे किंवा अंडी उकडताना पाण्यात साधं मीठ टाकतात, मात्र लिंबूचा एक छोटासा तुकडा टाकणं तुमचा स्वयंपाक आणखी सोपा करू शकतं. ही पद्धत भांड्यांची सुरक्षा आणि पोषणासाठीदेखील उपयोगी आहे.

लिंबूचा वापर केल्याने नेमके काय घडते?

अंडी उकडताना लिंबूचा तुकडा भांड्यात टाकला तर अंड्याचं कवच अगदी सहज काढता येतात. या पद्धतीत लिंबूचा रस पाण्याची पीएच पातळी बदलतो. हा बदल अंड्याचं कवच आणि आतला सफेद भाग यामधला भाग सैल करतं. त्यामुळे कवच काहीसं मऊ होऊन सहज निघून जातं. अजिबात न तुटता अंडी यामुळे सोलता येतात.

जर तुमच्या घरात हार्ड वॉटर येत असेल, तर हा जुगाड खूप उपयोगी आहे. हार्ड वॉट म्हणजेच क्षारयुक्त पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे मिनरल्स खूप जास्त असते. ते बटाटे आणि अंडी उकडलेल्या भांड्यावर पांढरा किंवा पिवळसर थर सोडतात. लिंबूमधील सायट्रिक अॅसिड या मिनरल्समध्ये मिसळले जाऊन हा पांढरा थर तयार होण्यापासून वाचवतात. यामुळे स्टील किंवा अॅल्युमिनियमची भांडी एकदम स्वच्छ राहतात आणि त्यांना घासून घासून साफ करण्याची गरज लागत नाही.

बटाट्यामध्ये स्टार्च असतो. बटाटे उकडताना पाण्याचा रंग अनेकदा बदलतो आणि बटाट्यातील पोषक तत्व पाण्यात मिसळून जातात. लिंबूमधील अॅसिड बटाट्यातील पिगमेंटला स्थिर करतं, त्यामुळे बटाट्याचा रंग उकडल्यानंतरही सफेद आणि स्वच्छ राहतो. शिवाय बटाट्यातील पोषक तत्वे त्यातच टिकून राहतात. यामुळे बटाटे जास्त शिजतही नाही.

प्रेशर कुकर किंवा मोठ्या भांड्यात वारंवार बटाटे किंवा अंडी उकडल्याने त्यात मिनरल स्केलिंग होतं. लिंबूचा उपयोग कुकरला अधिक काळापर्यंत सुरक्षित ठेवतात. लिंबू पाण्याचा हार्डनेस कमी करतो. जर तुम्ही रोज लिंबूचा वापर करत असाल, तर कुकरवर आणि रबर गॅस्केटवर मिनरल्सचा थर साचत नाही. कुकर अधिक काळ टिकतो.

लिंबूमध्ये अँटी-बॅक्टेरियल गण असतात. उकळत्या पाण्यात थोडंसं लिंबूसुद्धा आरोग्यासाठी उपयोगी ठरतं. उकळण्यादरम्यान लिंबू पाण्याला काहीसं शुद्ध करतं आणि कुठलाही वास घालवतं, जो काही भांड्यांना असतो. त्यामुळे या भांड्यामध्ये शिजणारे खाद्यपदार्थ सुद्धा ताजे, स्वच्छ आणि पोषणतत्व टिकून असलेले राहतात.