प्रत्येक घरात, रोजच्यारोज स्वयंपाक बनवला जातो. काही घरात, सकाळ-संध्याकाळ अशा दोन्ही वेळेस वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात. यासाठी, घरत भाजीपाला आणण्यासाठी आपण साधारण दर दोन दिवसांनी वगैरे बाजारहाट करण्यासाठी जातो. मात्र बाजारात गेल्यानंतर काही विशिष्ट भाज्या आपण घेताना आपण भाजी विक्रेत्याला, “ही चांगली निघेल ना? मागच्या वेळेस नेली होती ती खराब निघाली..” असा एक प्रश्न हमखास विचारतो. खासकरून अनेकजण हा प्रश्न वांगी विकत घेताना विचारतात. कारण- विकत घेतलेली वांगी चवीला चांगली निघतील का? यामध्ये भरपूर बिया तर नसतील ना? याचा अंदाज ती भाजी विकत घेताना काहींना लावता येत नाही.

तुम्हालादेखील अशी शंका, किंवा असा प्रश्न पडतो का? मग मास्टरशेफ पंकज भदौरियाने सांगितलेल्या या भन्नाट आणि अत्यंत सोप्या युक्तीचा वापर करून पाहा. शेफ पंकजने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील masterchefpankajbhadouria नावाच्या अकाउंट वरून ही भन्नाट ट्रिक शेअर केली आहे. तिचा वापर कसा करायचा ते पाहू.

Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
mango face mask for summer
उन्हाळ्यात फळांचा राजा घेईल तुमच्या थकलेल्या चेहऱ्याची काळजी! पाहा घरगुती मँगो फेस मास्क DIY
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

हेही वाचा : kitchen tips : तव्यावरील चिकट-काळा थर १० मिनिटांत होईल साफ! ही ट्रिक एकदा पाहाच…

चांगली वांगी कशी निवडावी?

  • शेफ पंकजने सांगितलेली ही ट्रिक भरताच्या वांग्यासाठी आहे.
  • सर्वप्रथम बाजारामध्ये गेल्यानंतर, टोपलीमध्ये ठेवलेल्या वांग्यांमधील दोन वांगी उचलून घ्यावी.
  • त्यापैकी कोणते वांगे वजनाला हलके आहे ते पाहा.
  • जे वांगे वजनाला हलके असेल ते विकत घ्यावे.
  • वांगे वजनाला जड असेल तर ते विकत घेऊ नये. कारण – त्यामध्ये बियांचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता असते. तसेच ते वांगे चवीला थोडे कडू असते.

अजून एक सोपी ट्रिक म्हणजे, वांग्यावर हलक्या हाताने हलके मारल्यास त्यामधून पोकळ आवाज येतो का हे तपासून पहा.
जर वांग्यावर हलके मारल्यावर ते पोकळ जाणवले तरी ते वांगे विकत घ्यावे.

असा भन्नाट आणि अत्यंत सोपा असा उपाय शेफ पंकजने व्हिडिओमधून सांगितलं आहे. मास्टरशेफ पंकजने दाखवलेली ही युक्ती किंवा ट्रिक तुम्ही बाजारात गेल्यावर वापरून पाहू शकता.

हेही वाचा : ‘ही’ एक गोष्ट रेशनच्या तांदळालाही देईल बासमतीसारखा वास! Video पाहून तुम्हीही व्हाल चकित…

शेफ पंकजच्या या व्हिडीओला आत्तापर्यंत १.५ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.