Milk Purity Check: सध्या भेसळयुक्त दूधाचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे आपण भेसळयुक्त दूध पितो का, हे तपासणे खूप गरजेचे आहे. पूर्वी दुधात भेसळ म्हणजे पाण्याची किंवा दूध पावडर टाकत असे पण आता दूधात केमिकल्स किंवा आरोग्यास धोकादायक पदार्य मिसळत असल्याचे अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत. यामुळे अशा भेसळयुक्त दुधामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते.
दूधात भेसळ असली तरी ते चवीला अगदी स्वादिष्ट वाटतं, त्यामुळे आपण ते ओळखू शकत नाही पण दीर्घकाळसाठी असंच भेसळयुक्त दूध वापरल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दूध भेसळयुक्त आहे की नाही, हे ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. आज आपण घरच्या घरी सोपे उपाय जाणून घेणार आहोत.
भेसळयुक्त दूधाचे आरोग्यावर कोणते परिणाम होतात
भेसळयुक्त असे दूध पिण्याचे अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा दुधाच्या सेवनामुळे पोटदुखी, उलटी, डोकेदुखी, किडनी आणि यकृताशी संबंधित समस्या वाढू शकतात. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांनी भेसळयुक्त दूध प्यायल्याने अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
कसे ओळखावे दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त?
दूध भेसळयुक्त आहे की नाही दूध उकळून जाणून घेता येते. शुद्ध दूध उकळतात, तेव्हा ते खराब होत नाही आणि त्यावर मलाईची एक लेअर जमा होते तसेच भेसळयुक्त दूध जेव्हा उकळतो तेव्हा ते अनेकदा खराब होते काही प्रकरणात असे दूध घट्ट होते.
आयोडीन टेस्टने दूध ओळखा
स्टार्च टेस्टमुळे सुद्धा भेसळयुक्त दूध ओळखले जाऊ शकतात. त्यामुळे सर्वात आधी दूध ब आयोडीनमध्ये टाका आणि आयोडिन टाकल्यानंतर दूध काळे पडत असेल तर त्यात स्टार्च आहे, असे समजावे. जर दूध शुद्ध असेल तर त्यात आयोडिन टाकल्यानंतर कोणताही बदल होत नाही.
वासावरून ओळखा दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त
शुद्ध दूधाचा सुगंध थोडा गोडसर आणि ताजा असतो तर भेसळयुक्त दूधाचा वास हा केमिकलसारखा असतो. त्यामुळे तिखटपणा किंवा केमिकलचा वास येतो.
दूधात पाण्याची भेसळ केली आहे, हे कसे ओळखावे?
दूधात पाण्याची भेसळ खूप साधारण गोष्ट आहे. तुम्ही घरी आलेल्या दूधात पाण्याची भेसळ केली आहे की नाही, हे खूप सोप्या पद्धतीने ओळखू शकता. यासाठी दुधाचा एक थेंब एखाद्या प्लेन गोष्टीवर (उदा. स्टील प्लेट किंवा काचेचा तुकडा) टाका. जर तो थेंब कुठेही न पसरता एकाच ठिकाणी असेल, तर ते दूध शुद्ध आहे, असे समजावे. जर ते दूध लगेच पसरले तर त्यात पाणी मिसळले, असे समजावे.