वाढत्या आरोग्यविषयक खर्चांमुळे आपल्या आर्थिक पोर्टफोलिओमध्ये आरोग्य विमा पॉलिसीचा समावेश करणे करणे आवश्यक बनले आहे. अन्यथा या खर्चामुळे आपल्या बचतीचा खूप मोठा हिस्सा कमी होऊ शकतो. आरोग्य विमा आपले आणि आपल्या परिवार दोघांचे आरोग्यसेवा क्षेत्रातील वाढत्या महागाईपासून संरक्षण करतो. सध्या बाजारात विविध वैशिष्ट्यांसह अनेक पॉलिसी उपलब्ध आहेत. त्यातील आपल्यासाठी योग्य आरोग्य विमा पॉलिसी निवडण्यासाठी काही घटक लक्षात घेतले पाहिजेत.

दावा निपटाऱ्याचे प्रमाण तपासा

upsc capf recruitment 2024 registration begins apply for 506 assistant commandant
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ‘इतक्या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या कशी होईल निवड, पगार आणि अर्जाची प्रक्रिया
itching all over body but no rash sign of something serious illness
Health Special: अंगभर खाज येते व पुरळ कुठेच नाही… ‘ही’ असू शकते गंभीर आजाराची सुरुवात!
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?

नावाप्रमाणेच ‘दावा निपटारा प्रमाण’ म्हणजे विशिष्ट पॉलिसी वर्षामध्ये विनंती केलेल्या दाव्यांच्या एकूण संख्येमधील, दिलेल्या दाव्यांचे प्रमाण होय. वैद्यकीय आपातकालीन स्थितीदरम्यान दावा मिळण्याची शक्यता किती आहे याची आपल्याला नेहमीच कल्पना येऊ शकते. कोणालाही संकटाच्या वेळी त्रासदायक स्थिती आवडणार नाही. किमान ९० टक्के दावा पूर्तता प्रमाण असलेल्या विमा कंपन्यांना प्राधान्य द्या.

आवश्यक असलेल्या कव्हरची मर्यादा

आपण ज्या शहरात राहतो त्या शहराच्या आधारे आपल्याला आवश्यक असलेल्या आरोग्य विमा संरक्षणाचा आकार आणि आपल्या कौटुंबिक इतिहासावर अवलंबून असणे आवश्यक आहे. या सर्वांची गणना करताना महागाईच्या घटकालादेखील विचारात घ्या. वाढत्या वयासोबत आपली आरोग्याची गरज आणि रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता विमा प्रीमियम सोबत वाढते. खरंतर, काही विशिष्ट वयानंतर आपल्याला पुरेसा विमा संरक्षण मिळविण्यासाठी अनेक वैद्यकीय चाचण्या करण्याची गरज पडू शकते. पहिल्या विम्याचे पुरेसे कव्हर निवडा म्हणजे आपल्याला वारंवार कव्हर वाढवण्याची गरज पडणार नाही.

वैयक्तिक विरुद्ध फॅमिली फ्लोटर

फॅमिली फ्लोटर पॉलिसी संपूर्ण कुटुंबाला एका सिंगल मर्यादेने संरक्षित करते ज्याचा वापर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला होऊ शकतो. फॅमिली फ्लोटर पॉलिसी आपल्या पती / पत्नी, पालक आणि २५ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे संरक्षण करते. आपल्या गरजेनुसार याची निवड करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर आपले पालक ज्येष्ठ नागरिक असतील तर, त्यांचे वय आणि जोखीम घटक समाविष्ट असल्यामुळे वेगळ्या विम्यामध्ये ठेवा. दुसरीकडे, जर तुम्ही कुटुंबातील प्रत्येकासाठी स्वतंत्र कव्हर घेतला, तर त्या फ्लोटर्सचा खर्च सामान्य फ्लोटरपेक्षा जास्त होईल.

जुने आजार आणि समाविष्ट प्रतीक्षा कालावधी

सर्व आरोग्य विमा कंपन्या जुन्या आजारांना कव्हर करतात परंतु कंपनीच्या अटी व शर्तीनुसार ३६ महिने ते ४८ महिने असा प्रतीक्षा कालावधी असतो. तर, अशी पॉलिसी निवडा जी अगोदरच्या आजारांवर कमी प्रतीक्षा कालावधीस परवानगी देते. लक्षात ठेवण्याची दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य विमा खरेदीच्या वेळी आपल्या आधीपासून असलेल्या आजाराची अचूक माहिती देणे. कोणत्याही चुकीच्या माहितीमुळे दावा नाकारला जाऊ शकतो.

योजनांची काळजीपूर्वक तुलना करा

आपण निवड करण्यापूर्वी, उत्पादनांची श्रेणी तपासा आणि वर वर्णन केलेल्या वैशिष्ट्यांची तुलना करा. एकदा आपण २ ते ३ संभाव्य आरोग्य पॉलिसी तपासल्यास, संबंधितांची बहिष्कारांच्या अटींशी तुलना करा. आपण विचारात घेऊ शकता अशा काही इतर वैशिष्ट्यांमध्ये अधिकतम नूतनीकरण वय, खर्चावरील उप-मर्यादा, नेटवर्कमधील रुग्णालये, अॅड-ऑन, गंभीर आजार आणि अपघाती रायडर सारखे रायडर्स, नो क्लेम बोनस बेनिफिट इत्यादींचा समावेश असू शकतो. कमी प्रीमियमच्या आधारावर आपली निवड करू नका तर योजनेशी संबंधित कमी अटी आणि शर्तीवर लक्ष ठेवा.

आदिल शेट्टी,

सीईओ , बँकबझार