How To Clean Gas Burner With Low Flame: सकाळी कामाच्या गडबडीत असताना गॅस शेगडीच्या एखाद्या बर्नरची फ्लेम कमी झाली की अक्षरशः वैताग येतो. एकीकडे कामावर जाण्याची घाई असताना दुष्काळात तेरावा महिना यावा तशीही शगेडीची मंदावलेली आच कामाचा वेग कमी करते. थंडीत अगोदरच गॅसवरच पाणी तापवायला वेळ जातो आणि त्यात पूर्ण आचही भांड्याला लागत नसेल तर तासभर असाच वाया जातो. पण गॅसची आच नेमकी कमी का होते हे तुम्हाला माहित आहे का? अनेकदा सततच्या वापरामुळे गॅस शेगडीच्या बर्नरमध्ये कार्बन गोळा होऊ लागतो. तुम्ही नीट पाहिलंत तर बर्नरवर असणाऱ्या छोट्या छिद्रांमध्ये कार्बन गोळा झाल्याने आच आग बाहेर पडण्यास अडथळा येतो. अशावेळी काही स्मार्ट हॅक करून तुम्ही गॅस बर्नर स्वच्छ करू शकता. यासाठीच आज आपण काही सोप्या टिप्स पाहणार आहोत.

इंस्टाग्रामवर @goblet_honey या पेजवर गॅस बर्नर स्वच्छ करण्याचा सोपा उपाय शेअर करण्यात आला आहे. चला तर गॅस बर्नर कसा साफ करायचा हे स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात..

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Video How To Clean Sticky Oil Bottle with Spoonful of Rice Remove Bad Smell and stickiness from plastic
तेलाच्या चिकट बाटलीत चमचाभर तांदूळ टाकून तर बघा; ५ मिनिटांत डाग, दुर्गंध असा करा गायब, पाहा Video
thief stole 50 crore gold toilet
बापरे, तब्बल १८ कॅरेट सोन्याच्या टॉयलेटची झाली चोरी! किंमत बघून व्हाल अवाक! जाणून घ्या नेमके प्रकरण
Video 5 Rupees Lemon Jugad How To Clean Gas Burners at Home
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video
  • एका भांड्यात ग्लासभर पाणी घेऊन कडक तापवून घ्या, यात दोन चमचे मीठ घालून ते विरघळेपर्यंत चमच्याने ढवळून घ्या.
  • दुसरीकडे एका वाटीत चमचाभर बेकिंग सोडा, एक चमचा भांडी घासायचा लिक्विड साबण अर्धा चमचा व्हिनेगर घालून नीट मिसळून घ्या.
  • यामध्ये आता गरम मिठाचे पाणी घालून छान फेस येईपर्यंत हलक्या हाताने ढवळायचे आहे.
  • मग या तयार द्रावणात तुमच्या गॅसचा बर्नर किमान १० मिनिट भिजवत ठेवा आणि मग टूथब्रशने किंवा भांडी घासायच्या काथ्याने हलक्या हाताने हा बर्नर घासून स्वच्छ करा.
  • तुम्ही बघू शकता की बर्नरची छिद्र आता मोकळी झाली असतील. यानंतर पाण्याने धुवून मग स्वच्छ पुसूनच बर्नर शेगडीला लावा.

गॅस बर्नर स्वच्छ कसा करावा?

हे ही वाचा<< दीड लिटर दुधाने बनवा अर्धा किलो तूप; पहा घरगुती सोपी रेसिपी

तुम्ही सवडीनुसार १५-२० दिवसातून एकदा अशाप्रकारे गॅसचा बर्नर स्वच्छ करू शकता. याशिवाय एक स्मार्ट टीप म्हणजे चुकूनही बर्नर ओला असताना शेगडीला लावू नका तो आधी कापडाने सुकवून घेतला असेल याची खात्री करा. तुम्हीही अशा काही स्मार्ट हॅक वापरत असाल तर कमेंट मध्ये नक्की कळवा.