How to Clean Bathroom Bucket Easily : प्रत्येक घरात प्लास्टिकच्या बदल्यांचा उपयोग केला जातो. प्लास्टिकची बादली हलकी आणि टिकाऊ असते. कपडे धुण्यापासून ते अंघोळीपर्यंत, पाणी साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक घरात मोठमोठ्या बादल्यांचा वापर केला जातो. पण, कालांतराने त्यांच्यावर डाग दिसू लागतात, तर कधीकधी, प्लास्टिकच्या बादल्यांवर पाणी, साबणाचे आणि अगदी बुरशी देखील दिसू लागते. बादलीवरील हे घाणेरडे डाग काढून टाकण्यासाठी, लोक अनेकदा फक्त पाण्याने स्वच्छ करतात. पण, फक्त पाणी ओतल्याने घाण पूर्णपणे बाहेर येत नाही. अशा परिस्थितीत, काही सोप्या घरगुती उपायांचा उपयोग करून तुम्ही हे डाग सहज घालवू शकता.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

प्लास्टिकची बादली स्वच्छ करण्यासाठी आणि त्यावरील डाग काढण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरू शकता. यासाठी, बादलीत २ ते ३ चमचे बेकिंग सोडा आणि अर्धा कप व्हिनेगर घाला आणि हे मिश्रण १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. आता ब्रश किंवा स्क्रबच्या मदतीने घासून स्वच्छ करा.

लिंबू आणि मीठ

प्लास्टिकची बादली स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मीठ देखील वापरू शकता. यासाठी, बादलीभोवती मीठ शिंपडा आणि त्यावर काही वेळ लिंबू चोळा. यामुळे डाग हलके होतील. आता डिशवॉशरच्या मदतीने स्वच्छ करून घ्या.

लिंबू आणि मीठाने स्वच्छ करा

प्लास्टिकची बादली स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मीठ देखील वापरू शकता. यासाठी, बादलीभोवती मीठ शिंपडा आणि त्यावर काही वेळ लिंबू चोळा. यामुळे डाग हलके होतील. आता डिशवॉशच्या मदतीने ते स्वच्छ करा.

डिटर्जंट आणि गरम पाणी

प्लास्टिक बादली चमकवण्यासाठी तुम्ही गरम पाणी आणि डिटर्जंट वापरू शकता. साचलेली घाण काढून टाकण्यासाठी हा खूप प्रभावी उपाय आहे. यासाठी बादलीत गरम पाणी ओता आणि २ ते ३ चमचे डिटर्जंट त्यात घाला. आता अर्धा तास तसेच राहू द्या. काही वेळाने ब्रशच्या मदतीने घासून स्वच्छ करा. पण, लक्षात ठेवा की पाणी जास्त गरम नसावे.

रोज वापरून पाण्याच्या डागांनी चिकट झालेली बादली असे साधेसोपे उपाय करून तुम्ही चमकवू शकता…