आपल्यापैकी फार कमी जण असतील ज्यांच्या घरी सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळा चहा बनवत नसेल. भारतात पाण्यानंतर सर्वाधिक प्यायले जाणारे पेय म्हणजे चहा आहे. या चहाशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. पण चहा गाळण्यासाठी वापरली जाणारी गाळणी वारंवार वापरल्यामुळे ती काळीकुट्ट दिसू लागते. दुध आणि चहा पावडरमुळे काळीकुट्ट झालेली गाळणी सहजा सहजी साफ करता येत नाही. म्हणून बहुतेक लोक काळी झालेली चहा गाळणी फेकून देतात आणि नवीन खरेदी करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, ४ सोप्पे घरगुती करुन तुम्ही काळी झालेली गाळणी चकचकीत स्वच्छ करु शकता. हे उपाय कोणते आहेत जाणून घेऊ..
‘या’ ४ घगरगुती उपयांच्या मदतीने करा चहाची गाळणी साफ
१) बेकिंग सोडा
बेकिंग पावडर नॅच्युरल क्लिन्झर म्हणून काम करते. ज्यामदतीने भांड्यावरील हट्टी मळ, तेलकटपणा कमी होतो, यासाठी सर्व प्रथम तुम्ही एका पॅनमध्ये पाणी गरम करा, नंतर त्यात एक ते दोन चमचे बेकिंग सोडा मिसळा. आता घाण झालेली चहाची गाळणी त्यात साधारण २ ते ३ तास बुडवून ठेवा. यामुळे गाळणीत जमा झालेली मळ कमी होईल, यानंतर ती गाळणी डिशवॉश लिक्विडच्या मदतीने घासून स्वच्छ करा.
२) ब्लीच
एका लहान भांड्यात पाणी घ्या आणि त्यात १ ते २ चमचे ब्लीच मिसळा. आता या मिश्रणात काळी झालेली चहाची गाळण सुमारे २० ठेवा. आता स्वच्छ पाणी, ब्रश आणि डिशवॉशच्या मदतीने ते पूर्णपणे स्वच्छ करा.
३) व्हाईट व्हिनेगर
व्हाईट व्हिनेगरचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो, परंतु तुम्ही त्याचा वापर स्टीलचा गाळणी साफ करण्यासाठी करू शकता. एका भांड्यात पांढरा व्हिनेगर घ्या आणि नंतर त्यात काळे झालेली गाळणी रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ब्रश आणि डिशवॉश लिक्विडच्या मदतीने स्वच्छ करा.
४) गॅस किंवा स्टोव्हवर ठेवा
तुम्ही चहाचे गाळणे कोणत्याही प्रकारे स्वच्छ केले तरी हरकत नाही, परंतु शेवटी ती गरम करण्यासाठी गॅस किंवा स्टोव्ह ठेवली पाहिजे. गॅसवर किंवा स्टोरवर स्टिलची गाळणी चांगली गरम केली तर त्यातील सर्व जंतू मरुन जातील यामुळे तुमच्या आरोग्याला कोणतीही हानी होणार नाही.