Electric Bulbs Cleaning Tips: इलेक्ट्रिक बल्ब हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, त्याशिवाय रात्री घरात अंधार होऊ शकतो. त्यासाठी आपण विशेष वीज बिल भरतो. हे बल्ब भिंतीवर वर्षानुवर्षे टिकतात. कित्येकदा हे बल्ब उंचावर असल्याने आपण त्यांना स्वच्छ करण्याची तसदी घेत नाही, ज्यामुळे ते खूप अस्वच्छ दिसतात आणि घराच्या सौंदर्यावरही वाईट परिणाम होतो. इलेक्ट्रिक बल्ब कसे स्वच्छ करावे ते जाणून घेऊ या. नियमित साफ केल्यास या बल्बची कार्यक्षमता वाढेल, ते नव्यासारखे दिसतील आणि प्रकाश अधिक पडेल.

इलेक्ट्रिक बल्ब कसे करावे साफ?

जेव्हा इलेक्ट्रिक बल्बचा प्रश्न येतो तेव्हा बहूतेक लोक जुने काचेचे बल्ब सोडून आता एलईडी आणि सीएफएळचे बल्ब वापरतात. जुन्या बल्बच्या तुलेतेत नवीन बल्ब जास्त प्रकाश देतात आणि ते जास्त काळ टिकतात. हे बल्ब वारंवार बदलण्याची आवश्यकता पडत नाही पण त्यांना नियमित साफ करण्याची गरज असते. पण इलेक्ट्रिक बल्बची सफाई करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा नुकसान होऊ शकते. नेहमी आपल्या इलेक्ट्रिक बल्बमध्ये धुळीचे कण जमा होतात आणि त्याचा प्रकाश कमी होतो त्यामुळे वेळच्या वेळी त्याची साफाई आवश्यक असते

हेही वाचा – टिव्ही, एसी किंवा पंख्याचा रिमोट खराब झालाय? ‘ही’ सोपी ट्रिक वापरून मिनिटांमध्ये करा दुरुस्त अन् तुमचे पैसे वाचवा

सावधगिरी बाळगा

इलेक्ट्रिक बल्ब साफ करताना सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे. येथे अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही पाळल्या पाहिजेत.

१. प्रथम वीज बंद असल्याची खात्री करा. प्लग काढा करा, बटण बंद करा किंवा मुख्य स्विच बंद करा. अतिरिक्त खबरदारी चांगले असते. त्यामुळे अपघात आणि विजेचा धक्का टाळता येईल.


२.बल्ब बर्‍याचदा गरम होतात, म्हणून एकदा पॉवर बंद केल्यावर, बल्ब साफ करण्यापूर्वी थंड होण्याची प्रतीक्षा करा. इलेक्ट्रिक बल्बमध्ये काही काळ वीज शिल्लक असू शकते जी तुम्हाला शॉक देऊ शकते आणि गरम बल्ब साफ करू नये.

हेही वाचा – पावसाळ्यात घरात शिरणाऱ्या किड्यांपासून सुटका हवीये? ‘हे’ सोपे उपाय वापरून पाहा

३.साफ करताना बल्ब होल्डरमधून बाहेर काढणे चांगले आहे, कारण होल्डर जोडलेले असताना ब्लब साफ करणे आपल्यासाठी अधिक कठीण होईल.

४. बल्ब नेहमी कोरड्या कापडाने किंवा डस्टरने स्वच्छ करा, ओले कापड वापरणे धोकादायक आहे. आणि जर तुम्ही ओल्या कपड्याने गरम बल्ब साफ केला तर त्याचा स्फोट होऊ शकतो. कोरडे मायक्रोफायबर कापड हा सर्वोत्तम पर्याय आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५.बल्ब स्वच्छ झाल्यावर तो परत होल्डरमध्ये ठेवा आणि नंतर त्याला जोडलेले सर्व स्विच चालू करा.