Cleaning Clothes Hacks: पूर्वी कपडे धुणे हा एक उत्तम व्यायाम मानला जात होता. यामध्ये बसून कपडे धुतल्याने ओटीपोट तसेच हाताच्या हालचालीमुळे दंडाचे फॅट्स कमी व्हायला सुद्धा मदत होत होती. पण मग अनेकांच्या आयुष्यात अनेक इतर कामे महत्त्वाची झाल्याने हाताने कपडे धुण्याला पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरु झाले. इथूनच आपल्या आयुष्यात आली वॉशिंग मशीन. आजतर अगदी खेड्यापाड्यापासून ते शहरात सगळीकडे वॉशिंग मशीन वापरली जाते. यात वेळ वाचत असला तरी स्वच्छता होते का हा प्रश्न असतोच. वॉशिंग मशीन वापरणाऱ्या माणसांची एक मोठी समस्या म्हणजे शर्टची कॉलर! शर्टच्या कॉलरला आलेली मळकट रेष इतकी जिद्दी असते की कितीतरी वेळा घासूनही जात नाही. अशावेळी आपण काय करू शकता हे आज आपण पाहणार आहोत.

इंस्टाग्रामवर @appliancegurukul या अकाउंटवर शेअर केलेल्या एका व्हिडीओनुसार, आपल्या मानेला किंवा केसाला लागलेला घाम व तेल हे धूळीसह मिसळून तो मळ शर्टाला लागण्याची शक्यता असते. अनेकदा हा मळ घासून निघत नाही. किंवा साबणाचा/पावडरचा फेसही हा मळ काढू शकत नाही. अशावेळी तुमच्याकडे असणारा शॅम्पू हा उत्तम पर्याय ठरतो. केसाचे तेल शॅम्पूने सहज निघू शकते आणि म्हणूनच मळही स्वच्छ होऊ शकतो.

शर्टच्या कॉलरचा मळ कसा काढावा?

हे ही वाचा<< दीड लिटर दुधाने बनवा अर्धा किलो तूप; पहा घरगुती सोपी रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जर तुम्ही पावडर वापरणार असाल तर शर्ट किंवा इतर कोणतेही कपडे एक तासभर भिजवून ठेवा. एक तासानंतर, साध्या ब्रशने किंवा हाताने घासून स्वच्छ करा. त्यामुळे कॉलरवर असलेले तेल, घाम, पावडर इत्यादीचे डाग सहज निघून जातील. याशिवाय तुम्ही सुद्धा काही वेगळ्या हॅक वापरत असाल तर कमेंटमध्ये नक्की कळवा.