How to clean Stomach Detox Liver: आजकालच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे कठीण झाले आहे. चुकीचे खाणे-पिणे आणि वाईट जीवनशैलीमुळे अनेक आजार पटकन होऊ लागले आहेत. आज पचनाची समस्या आणि रक्तातील साखरेची समस्या खूप सामान्य झाली आहे. तुम्हालाही असे आजार होत असतील तर शेवग्याची (मोरिंगाची) पाने तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. आयुर्वेद आणि नैसर्गिक आरोग्यशास्त्रात शेवग्याची पाने सुपरफूड मानली जातात.

शेवग्याच्या पानांचे फायदे

जनरल फिजिशियन, कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबेटॉलॉजिस्ट डॉ. शालिनी सिंह साळुंखे यांच्या मते, शेवग्याच्या (मोरिंग्याच्या) पानांमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन A, C आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. शेवग्याची पाने पचन,लिव्हर आणि रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी खूप फायदेशीर आहेत. तज्ञांच्या मते, शेवग्याची पाने ही एखाद्या औषधापेक्षा कमी नाहीत. ही पाने शरीरातील विषारी द्रव्ये (टॉक्सिन्स) बाहेर काढतात, पचन सुधारतात आणि लिव्हर मजबूत करतात.

लिव्हरसाठी फायदेशीर

लिव्हर बरोबर काम करत नसेल तर थकवा येणे, भूक न लागणे, पिवळे डोळे व त्वचा (कावीळ), पोट फुगणे आणि उलटी होणे अशी लक्षणे दिसू शकतात. लिव्हरच्या आजारांमध्ये हेपेटायटिस, फॅटी लिव्हर, सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सर यांचा समावेश होतो. लिव्हर चांगले ठेवण्यासाठी शेवग्याची पाने खूप उपयोगी आहेत. शेवग्याच्या पानांत अँटिऑक्सिडंट आणि क्लोरोफिल भरपूर असतात. हे लिव्हरमध्ये जमा झालेली चरबी कमी करतात. याशिवाय शेवग्याच्या पानांत व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E आणि फ्लेव्होनॉईड असतात, जे लिव्हरसाठी फायदेशीर आहेत. शेवग्याची पाने लिव्हर साफ (डिटॉक्स) करण्यातही मदत करतात.

ब्लड शुगर कंट्रोल

शेवग्याची पाने सकाळी रिकाम्या पोटी खाल्ली तर साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) सहज नियंत्रणात ठेवता येते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ५–६ शेवग्याची पाने खाल्ल्याने साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं. काही संशोधनानुसार, शेवग्यामध्ये आढळणारे इन्सुलिनसारखे प्रोटीन रक्तातील साखर कमी करण्यात मदत करतात.

पचनासाठी प्रभावी

ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत त्यांनी शेवग्याची पाने खावी. शेवग्यामधील जंतूनाशक गुण पोटातील वाईट जंतू नष्ट करतात. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. यासाठी सकाळी रिकाम्या पोटी शेवग्याची पाने पाण्यात उकळून प्यायल्याने फायदा होतो.