Kitchen Tips for wooden utensils: स्वयंपाकघरात लाकडी भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. लाकडी भांडी दिसायला फारच आकर्षक असतात. असं असताना ते अनेकदा तेल आणि मसाल्यांचे अवशेष जमा करतात आणि त्यामुळे ते जितके सुंदर आणि स्वच्छ सुरूवातीला दिसतात, तेवढे वापरानंतर दिसत नाही.
दरम्यान, स्वयंपाकघरातील लाकडी चमचे आणि इतर भांडी व्यवस्थित स्वच्छ केली नाही, तर त्याला दुर्गंधी येऊन त्यावर घाण आणि तेलकटपणा जमा होतो. ती आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. त्यामुळे त्यांना योग्यरित्या स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे. काही सोप्या पद्धती वापरून तुम्ही ही लाकडाची भांडी अगदी स्वच्छ करू शकता.
पहिली पद्धत
लाकडी भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. घआण काढून टाकण्यासाठी ते खूप प्रभावी आहे. ते वापरण्यासाठी आधी एका भांड्यात कोमट पाणी भरा आणि त्यात एक चमचा बेकिंग सोडा घाला. या पाण्यात लाकडाची भांडी १५ ते २० मिनिटे भिजवा. काही वेळाने ब्रशने हळबवारपणे घासून ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे कोणताही तेलकट थर सहज निघून जातो.
दुसरी पद्धत
जर लाकडी भांड्यांमध्ये खूप घाण जमा झाली असेल, तर तुम्ही त्यांना जाडं मीठ आणि लिंबूनेही स्वच्छ करू शकता. चमच्यावर थोडे जाडे पीठ शिंपडा आणि त्यावर लिंबूने घासा. हे मिश्रण लाकडी पृष्ठभागावरील घाण आणि बॅक्टेरिया दोन्ही काढून टाकते.
तिसरी पद्धत
पाणी गरम करा आणि त्यात लाकडाची भांडी घाला. त्यांना काही मिनिटे उकळवा. नंतर ती डिशक्लोथप्रमाणे धुवा आणि वाळू द्या. नंतर ती स्वच्छ कापडाने पुसून घ्या. अशा प्रकारे तुमची लाकडाची भांडी पूर्णपणे स्वच्छ होतील.