Cauliflower Cutting Tips: हिवाळा सुरू होताच बाजारात ताज्या भाज्यांची रेलचेल दिसते. त्यामध्ये फ्लॉवर ही सगळ्यांची आवडती भाजी असते. पण तुम्हाला माहिती आहे का, बहुतांश लोक फ्लॉवर कापताना एक छोटीशी चूक करतात, ज्यामुळे तिची खरी चव आणि टेक्स्चर खराब होते. प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी अलीकडेच फ्लॉवर कापण्याची किंवा तोडण्याची बरोबर पद्धत सांगितली आहे.
फ्लॉवर कापण्याची योग्य पद्धत
सर्वात आधी बाहेरील पाने काढा
शेफ कुणाल यांच्या म्हणण्यानुसार, सर्वात आधी फ्लॉवरवर लागलेली बाहेरील पाने एकेक करून काढा. ही पाने बहुतेक वेळा धूळ आणि मातीने भरलेली असतात. जर ती तशीच ठेवली, तर ती घाण फ्लॉवरच्या आतपर्यंत जाते. त्यामुळे ही पाने स्वच्छ करून वेगळी काढून टाका.
देठ कापा आणि फ्लॉवर मधून तोडा
यानंतर फ्लॉवरच्या खालच्या बाजूचा जाड देठ चाकूने कापा. हाच भाग संपूर्ण फ्लॉवरला एकत्र धरून ठेवतो. आता चाकूने त्या देठावर मध्ये थोडाशी चिर द्या आणि दोन्ही हातांनी हलकेच ओढत फ्लॉवर मधून तोडा. त्यामुळे फ्लॉवर दोन समान भागांत विभागली जाईल आणि तिचे छोटे फुलोरे म्हणजे फ्लोरेट्स सहजपणे वेगळे करता येतील.
फ्लॉवरचे चार भाग करा
आधी दोन भागांत तोडलेली फ्लॉवर आता पुन्हा मध्येून तोडून चार भाग करा. त्यामुळे छोटे-छोटे तुकडे कापणे सोपे जाईल आणि फुलोऱ्यांचा आकारही तसाच राहील.
फुलोरे काळजीपूर्वक कापा
आता चाकूच्या मदतीने फ्लॉवरचे छोटे-छोटे फुलोरे कापा. लक्षात ठेवा, त्यांना खूप बारीक कापू नका, नाहीतर भाजी शिजवताना ते तुटू शकतात आणि आपला आकार गमावतात.
देठ आणि नाजूक पानेसुद्धा वापरा
फ्लॉवर कापताना बरेच लोक तिचा देठ आणि छोटी पाने फेकून देतात. पण शेफ कुणाल यांच्या म्हणण्यानुसार, हा भाग पोषक तत्वांनी भरलेला असतो. देठाच्या बाजूने थोडं ट्रिम करा आणि आतला मऊ भाग छोटे चौकोनी तुकडे करून कापा. हे तुकडेही भाजीमध्ये घाला, त्यामुळे भाजीची चव आणि टेक्स्चर दोन्ही छान लागतील.
कापू नका, तोडा – हेच महत्त्वाचं आहे
शेफ कुणाल यांच्या म्हणण्यानुसार, फ्लॉवर फक्त कापल्याने तिचे फुलोरे तुटतात आणि भाजीची बनावट खराब होते. म्हणून आधी ती हलकेच तोडा आणि नंतर कापा- हाच परफेक्ट मार्ग आहे. त्यामुळे भाजी दिसायलाही सुंदर लागेल आणि तिचा स्वादही तसाच राहील.
आता तुम्हाला फ्लॉवर कापण्याची योग्य पद्धत माहिती झाली आहे, त्यामुळे पुढच्या वेळी भाजी करताना ही ट्रिक नक्की वापरून बघा. त्यामुळे तुमची भाजी रेस्टॉरंटसारखी दिसेल आणि चवीतही अजून छान लागेल. फक्त थोडं लक्ष द्या आणि हिवाळ्यातील या सुगंधी फ्लॉवरच्या भाज्याचा आनंद घ्या.
