How To Eat Watermelon In Seven Style : उन्हाळ्यात सतत काही ना काही थंडगार प्यावेसे वाटते. त्यातही अनेकांना उसाचा रस, आइस्क्रीम, रसाळ व थंडगार कलिंगड खायला भरपूर आवडते. हे फक्त चविष्टच नाही, तर त्यात हायड्रेशन, आवश्यक जीवनसत्त्वे व अँटिऑक्सिडंट्स भरपूर आहेत; जे एक संपूर्ण सुपरफूड आहे. जेव्हा उन्हाळा सुरू होतो तेव्हा रसाळ कलिंगडासारखे थंड आणि ताजेतवाने अन्न दुसरे काहीच असू शकत नाही.
पण, सहसा आपण कलिंगडाचे छोटे छोटे तुकडे करून त्याचे सेवन करतो. पण, कलिंगडाला तुमच्या आहारात समाविष्ट करण्याचे वेगवेगळे मार्गसुद्धा असू शकतात, हे पुढील बातमीत तुम्ही वाचू शकता.
कलिंगडाचे छोटे तुकडे (Fresh Slices of Watermelon)
कलिंगडामध्ये ९०% पेक्षा जास्त पाणी असते, ज्यामुळे उष्णतेमध्ये हायड्रेटेड राहण्यासाठी एक उत्तम फळ आहे. फक्त कलिंगडाचे तुकडे करा आणि आनंद घेऊन ते खा. कमी कॅलरी, थंडगार आस्वाद तुम्हाला नैसर्गिकरीत्या तृप्त करेल.
कलिंगडाची स्मूदी (Watermelon Smoothie)
उन्हाळी पेय बनवण्यासाठी कलिंगडात बर्फ, थोडासा लिंबू व मूठभर पुदिना किंवा तुळस मिक्स करा . प्रथिने वाढवण्यासाठी आणि क्रीमी टेक्श्चरसाठी तुम्ही ग्रीक दहीसुद्धा घालू शकता.
कलिंगडचे सॅलड (Watermelon Salad)
कलिंगडाचे तुकडे, फेटा चीज (feta cheese), काकडी, पुदिना व थोडे ऑलिव्ह ऑइल घालून गोड आणि चविष्ट सॅलड बनवा. हे सॅलड पचायला हलके, पोषक घटकांनी समृद्ध आहे.
फ्रोझन कलिंगड पॉप्स (Frozen Watermelon Pops)
तुम्ही कलिंगडाची प्युरी करा. पॉप्सिकल मोल्डमध्ये ओता आणि फ्रीज करा. त्यामुळे साखरेशिवाय एक मजेदार, मुलांसाठी एक थंडगार पदार्थ ठरवेल; जो तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे.
कलिंगडचा साल्सा (Watermelon Salsa)
कलिंगडाचे बारीक तुकडे करा आणि त्यात लाल कांदा, जलापेनो, कोथिंबीर व लिंबाचा रस मिसळा; जेणेकरून फ्रूटी साल्सा चवदार होईल. हे ग्रील्ड फिश, चिकन किंवा अगदी टॉर्टीला चिप्सबरोबरही चांगले ठरेल.
कलिंगडाचा रस (Watermelon Juice or Infused Water)
नैसर्गिकरीत्या गोड रस मिळविण्यासाठी कलिंगड प्युरी करा आणि ती गाळा. तुमच्या पाण्याच्या बाटलीत त्याचे तुकडे घाला. हायड्रेटेड राहण्याचे आणि साखरयुक्त पेयांचे सेवन कमी करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
स्मूदी बाऊल्स किंवा दह्यामध्ये कलिंगड घाला (Watermelon in Smoothie Bowls or Yoghurt Parfaits)
स्मूदी बाऊल्समध्ये कलिंगडाचे छोटे तुकडे घाला. यामुळे तुम्हाला अ व क ही
जीवनसत्त्वे मिळतील.