Home Remedies For Damp Mattress : पावसाळ्यात अनेक घरांच्या भितींमध्ये ओलसरपणाची समस्या जाणवते. त्यात सतत दोन ते तीन दिवस सतत पाऊस पडला, तर सुकत घाललेले कपडे आणि अंथरुणांमधून विचित्र वास येऊ लागतो, घरात ज्याजास्त आर्द्रता असलेल्या ठिकाणी ही समस्या विशेषत: जाणवते. बेडवरील चादर किंवा आतील अंथरूण वरून स्वच्छ दिसत असले तरी त्यात थोडासा जरी ओलावा राहिला तरी त्यात बुरशी आणि जीवाणू वाढू लागतात. अशाने स्वाभाविकपणे कुबट वास येणारी अंथरुणे अंगावर घेऊन झोपणे मनाला पटत नाही.
त्यात तुम्हीही अंथरुणे कितीही हवेत किंवा उन्हात ठेवली तरी पावसात पुन्हा त्यातून वास यायचा तो येतोच. पण, या समस्येपासून सुटुका करून घेण्यासाठी तुम्ही खालील काही सोप्या घरगुती उपायांचे अनुसरण करू शकता.
अंथरुणाचा कुबट वास, दुर्गंधी कशी दूर करावी? (How To Get Rid of Mattress dirty Smell)
अंथरुणातून येणारा कुबट वास, दुर्गंधी आणि ओलसरपणा दूर करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि तुरटीचा वापर करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात बेकिंग सोडा घ्या. त्यात बारीक वाटलेली तुरटीची पावडर मिसळा. आता ही तयार पावडर पलंगावर नीट शिंपडा. आता ती पावडर दोन-तीन तास तशीच राहू द्या. नंतर टॉवेल किंवा स्वच्छ कापडाने पलंग स्वच्छ करा. जर खूप वास येत असेल, तर त्या मिश्रणात टाल्कम पावडर मिसळून मग ती पलंगावर शिंपडा.
कापूर आणि व्हिनेगर
अंथरुणातील कुबट, घाणेरडा वास दूर करण्यासाठी तुम्ही कापूर, व्हिनेगर व लिंबाचा रस वापरू शकता. त्यासाठी प्रथम कापूर बारीक करून, पावडर बनवून घ्या. आता ही पावडर एका भांड्यात काढा आणि त्यात व्हिनेगर व लिंबाचा रस मिसळून द्रावण तयार करा. आता तो स्प्रे बाटलीत भरा आणि अंथरुणांच्या किनाऱ्यावर स्प्रे करा. आता ही अंथरुणं उन्हात किंवा पंख्याखाली सुकण्यासाठी ठेवा.
तुम्ही अंथरुणांतील कुबट वास दूर करण्यासाठी ड्रायरचाही वापर करु शकता. तुम्ही ओलसर अंथरुणांना ड्रायरने हिट देत, ती दुर्गंधीपासून दूर ठेवू शकता. तसेच घरात ज्या ठिकाणी ओलावा अधिक आहे अशा ठिकाणी अंथरुणे घडी करून ठेवू नका.