कच्चा कांदा खाणे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असते. यात सल्फर, पोटॅशियम आणि जस्त यासारखे अनेक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. कांद्याचे सेवन केल्याने रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. याशिवाय तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते ज्यामुळे अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत होते. कांदा खाण्याचे अनेक फायदे असले तरी तो खाल्ल्यानंतर तोंडातून विचित्र वास येतो. कांद्यातील सल्फर घटकामुळे तोंडावाटे दुर्गंधी येते. अशावेळी ही दुर्गंधी कशी कमी करायची समजत नाही. पण पुढच्या वेळी कांदा खाल्ल्यानंतर तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीची काळजी करुन नका, कारण आम्ही तुम्हाला या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी ३ प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत.

कांदा खाल्ल्यानंतर तोंडातून येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी सोपे उपाय

१) कांदे खाण्यापूर्वी लिंबू किंवा व्हिनेगरमध्ये ठेवा

जर तुम्ही रोजच्या जेवणात कच्चा कांदा खात असाल तर खाण्यापूर्वी कांद्यावर लिंबू पिळून ठेवा. याशिवाय तुम्ही कांदा व्हिनेगरमध्येही बुडवू ठेवू शकता. हॉटेलमध्ये जेवताना तुम्ही कांद्यावर अनेकजण लिंबू पिळत असल्याचे पाहिले असेल. असे केल्याने गंध आणि सक्रिय घटक न्यूट्रलाइज करण्यात मदत होऊ शकते. यामुळे तुम्ही कांदा खाल्ल्यास तोंडातून दुर्गंधी येणार नाही.

हेही वाचा : महात्मा गांधींचा डाएट प्लॅन कसा होता? जो ‘या’ गंभीर आजारांपासून ठेवतो दूर! वाचा डॉक्टर काय सांगतात

२) बडीशेप खा

कच्चा कांदा खाल्ल्यानंतर त्यावर बडीशेप खाल्ल्याने तोंडातून येणारी दुर्गंध दूर होण्यास मदत होते. बडीशेप काही सुगंधी गुणधर्मांनी समृद्ध असते जी चघळल्याने तोंडाच्या लाळेतील बॅक्टेरियाची क्रिया बदलते, ज्यामुळे कांद्याचा वास निघून जातो आणि श्वासावर बडीशेपचा चांगला वास येतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३) वेलची करा वापर

वेलची तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर वेलची खाणे केवळ तुमच्या पाचक एंझाइमांना चालना देण्यासाठी उपयुक्त नाही तर ते तुमच्या तोंडातील दुर्गंधी देखील दूर करू शकते. वेलची खाल्ल्याने तुमचे तोंडातील स्वच्छ राखण्यास मदत होते. शिवाय बॅक्टेरियाच्या क्रियाकलापांना शांत करू शकते. यासोबतच ही तुमच्या श्वासातील कांद्याचा वास दूर करते, ज्यामुळे तुमच्या तोंडातून कांद्याचा वास येत नाही.