How To Grow A Money Plant : वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावणे, शुभ मानले जाते. अनेकजण घरी आवडीने मनी प्लांट लावतात पण काही लोकांना मनी प्लांट कसा लावायचा, याविषयी माहीत नसते. आज आपण मनी प्लांट कसा लावायचा, हे सविस्तर जाणून घेणार आहोत.

मनी प्लांटचे फायदे –

  • मनी प्लांट हवा शुद्ध करण्यास मदत करतात.
  • मनी प्लांट घरी लावल्यामुळे स्ट्रेस दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जा राहते.
  • मनी प्लांट आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शरीरास हानिकारक असलेल्या रेडिएशन पासून आपल्याला दूर ठेवतात.

‘खमंग मेजवानी आणि बरेच काही’ या युट्यूब अकाउंटवरुन मनी प्लांट कसा लावायचा यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओत मनी प्लांट लावायची सोपी पद्धत दाखवली आहे. जाणून घेऊ या, मनी प्लांट कसा लावायचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : कोल्हापूरी तडका! तरुणाने घेतला रांगडा कोल्हापूरी उखाणा, व्हिडीओ एकदा पाहाच

मनी प्लांट कसा लावायचा?

  • सुरुवातीला मनी प्लांटचा वेल घेऊन या.
  • पानापासून रोप तयार करण्यासाठी वेलीवरचा खराब भाग वेगळा करा
  • प्रत्येक पानाच्या वरुन देठ असे कापा की मुळाचा भाग दिसेल.
  • हा मुळाचा भाग जमीनीत लावायचा आहे यामुळे रोपं लवकर तयार होतील.
  • जर तुमच्याकडे मूळ नसलेला वेल असेल तरी तुम्ही लावू शकता.
  • प्रत्येक पानापासून वेल तयार करता येऊ शकतो.
  • एक मातीची कुंडी घ्या त्यात प्रत्येक पान मुळासह लावा.
  • कुंडीच्या मध्यभागी मोठी फांदी लावा.
  • मनी प्लांटला सुर्यप्रकाशाची आवश्यकता नसते.
  • त्यानंतर या कुंडीला नियमित थोडं थोडं पाणी घाला.
  • त्यानंतर प्रत्येक पानापासून वेल तयार व्हायला सुरुवात होईल तेव्हा तुमच्या आवडीनुसार या वेलीला आकार द्या