Clothes Iron Easy Tips : हल्ली सिल्कचे कपडे घालण्याची एक वेगळी क्रेझ पाहायला मिळतेय. तरुणांसह आता तरुणी देखील सिल्कच्या शर्टला पसंती देत आहेत. ऑफिसपासून ते पार्टीवेअर गेटअपसाठी सिल्क शर्टची मागणी दिसून येते. परंतु हे सिल्कचे कपडे धुताना योग्य काळजी न घेतल्यास त्यांचे आयुष्य कमी होते. अशा परिस्थितीत इस्त्री करतानाही खूप काळजी घ्यावी लागते. कारण सिल्कचा कपडा अतिशय नाजूक असतो. ज्यावर इस्त्रीचा जास्त प्रेस झाला तर ते लगेच जळतात. त्यामुळे सिल्क कपडे इस्त्री करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. दरम्यान सिल्कचे कपडे न जळता इस्त्री करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स जाणून घेऊ….
फॉइल पेपरचा वापर करा
ॲल्युमिनियम फॉइल पेपरची एक खासियत म्हणजे तो लवकर जळत नाही. त्यामुळे रेशमी कपडे इस्त्री करण्यासाठी तुम्ही फॉइल पेपरचा वापर करु शकता. तुम्हाला सिल्क साडी किंवा सूटचा कोणतेही सिल्कचे कपडे इस्त्री करायचे असतील तर त्या कपड्यांवर फॉइल पेपर ठेवा आणि मग इस्त्री करा. याने कापड व्यवस्थित इस्त्री होईल आणि जळणारही नाही.
कपडे उलटे करुन मग इस्त्री करा
टेंप्रेचर कंट्रोल इस्त्रीचा वापर करु शकता. तुमचा आवडता ड्रेस जळू नये अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही सिल्कचे कपडे इस्त्री करताना ते उलटे करा. यासाठी प्रथम प्रेसला सिल्क कपड्यांसाठी असलेले टेंप्रेचर सेट करा आणि नंतर ड्रेस उलटा करा. असे केल्यानंतर कपडे पटापट इस्त्री करुन घेतले पाहिजेत.
कागदाची मदत घ्या
सिल्कच्या कपड्यांवर कागद ठेवून इस्त्री केल्याने तुमच्या कपड्यांची चमक टिकून राहते आणि ते जळण्यापासूनही वाचतात. यासाठी दोन कागद घ्या आणि ते एका रेशमी कापडावर ठेवा. यानंतर त्यावर इस्त्री करा.