How to Keep Cool Water Tank in Summer : मे महिना सुरू असल्याने उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. या परिस्थितीत लोकांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी तापमान ४५ अंशांच्या पुढे जात आहे. अशा परिस्थितीत लोक थंडाव्यासाठी एसी, कुलरचा वापर करताना दिसतात. पण, दुपारच्या वेळी सर्व काम आटपून बाथरुममध्ये जाताच तिथे नळातून इतकं गरम पाणी येतयं की अंघोळ करण्याचं मन होत नाही.

घराच्या छतावर ठेवलेली टाकी उन्हामुळे एवढी तापतेय की, नळातून उकळतं पाणी येऊ लागते. उन्हाळ्यात अशा पाण्याने अंघोळ करणं तर दूर, त्याने हात धुण्याचीदेखील इच्छा होत नाही. पण, आता एवढी मोठी टाकी दुसरीकडे उचलून तर ठेवता येत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कडक उन्हातही छतावरील टाकीतील पाणी १०० टक्के थंडगार ठेवू शकता.

उन्हाळ्यात टाकीतील गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे सकाळी लवकर अंघोळ करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही, त्यामुळे टाकी खरेदी करतानाच नेहमी काळ्या नाही तर फिकट निळ्या, पांढऱ्या रंगाची टाकी खरेदी करा, कारण अशा रंगाच्या टाक्यांमध्ये पाणी तितकेसे गरम होत नाही.

छतावरील पाण्याची टाकी थंड ठेवण्यासाठी सोप्या ट्रिक्स (How to keep cool water tank in summer india)

१) थर्माकोल

थर्माकोलच्या मदतीने तुम्ही छतावरील पाण्याची टाकी उन्हामुळे गरम होण्यापासून वाचवू शकता. थर्माकोल उष्णता रोखण्याचे काम करते, यामुळे तुम्ही टाकीच्या आकारानुसार थर्माकोल खरेदी करा. तो व्यवस्थित आकारानुसार कापून टाकीच्या बाजूने आणि झाकणावर टेपच्या मदतीने चिकटवा. संपूर्ण टाकीला थर्मकोल चिकटवणं शक्य नसेल तर ज्या बाजूने टाकीवर सूर्यप्रकाश अधिक पडतो, तिथे तो चिकटवा.

२) तागाच्या गोण्या

तुम्ही टाकीभोवती तागाच्या गोण्या पसरवून पाणी थंड ठेवू शकता. यासाठी गोण्या दोरीच्या मदतीने सर्व बाजूंनी टाकीभोवती बांधा, तुम्ही टाकीच्या आकारानुसार गोण्या कव्हरप्रमाणे शिवूनदेखील घेऊ शकता. या गोण्या टाकीवर नीट बांधून घ्या. टाकीच्या झाकणावरही गोणी बांधा. यानंतर त्यावर पाण्याची फवारणी करा.

दररोज सकाळी आणि एकदा टाकीच्या टाकलेल्या गोण्यांवर पाईपने पाण्याची फवारणी करा. कारण बाहेरून गोण्या ओल्या झाल्याने आतील पाणी थंड राहील. अशाप्रकारे पाण्याचे पाईपदेखील झाकून ठेवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय तुम्ही टाकीभोवती एक तात्पुरती शेड तयार करून घेऊ शकता किंवा विटांपासून कायमची शेडही बांधून घेऊ शकता, यामुळे टाकीतील पाणी जास्त तापणार नाही.