हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या बाजारात मोठ्याप्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे अनेकांच्या घरात पालक, मेथी, मोहरीची पानं, कांद्याची पाल, लाल माट अशा अनेक प्रकारच्या भाज्या रोज किंवा काही दिवस आड करुन तरी बनवल्या जात असतील. या पालेभाज्यांपासून फक्त भाजाच नाही तर इतरही अनेक पदार्थ बनवले जातात. पण पालेभाज्या व्यवस्थित साठवल्या नाहीत तर त्या एका दिवसात कोमेजतात, त्यानंतर कुजू लागतात. अशावेळी त्या फेकून देण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय राहत नाही. म्हणून आपण आज हिरव्या पालेभाज्या दीर्घकाळ कशा साठवायच्या याच्या काही टिप्स जाणून घेणार आहोत.
हिरव्या पालेभाज्या साठवण्याच्या काही सोप्या टिप्स
१) ताज्या पालेभाज्याचे देठ काढून पाने वेगळी करा, यानंतर ही पानं न धुता वर्तमानपत्रात गुंडाळून कापडी पिशवीत ठेवा आणि रेफ्रिजरेटरमध्ये स्टोर करा, अशाप्रकारे पुढील दोन- तीन दिवस तुम्ही ह्या भाज्या वापरु शकता.
२) कोथिंबीर जास्त दिवस हिरवीगार ठेवण्यासाठी पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये मुळांसह भिजवून ठेवा. तसेच तुम्ही कोथिंबीर नीट साफ करुन एका हवाबंद डब्यात रुमालात गुंडाळून ठेवू शकता.
३) मेथीच्या पानांची देठ काढून त्यानंतर न धुता कागदी पिशवीत गुंडाळून ठेवा. ही पानं वर्तमानपत्रात ठेवू नका, मोहरीची पानं पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा आणि झिप लॉक बॅगमध्ये ठेवा.
४) मेथी/पालक/चंदन बटवा/कोथिंबीर/मुळ्याची पाने/मोहरीची हिरवी पानं एका तळाशी पेपर टॉवेलट टाकून हवाबंद डब्यात ठेवा. तसेच त्याच्या वरही पेपर टॉवेल ठेवा.
५) हिरवी कोथिंबीर पाण्याने धुवा आणि काही वेळ बर्फाच्या पाण्यात ठेवल्यानंतर गाळून घ्या. यानंतर हवेत वाळवा आणि बारीक चिरून घ्या आणि हवाबंद डब्यात ठेवा.
६) लहान, मध्यम आणि मोठ्या साइजच्या कापडी पिशव्या घ्या आणि मोठ्या पानांच्या भाज्या जसे की, मोहरीची पानं, मुळ्याची पानं फ्रीजमध्ये ठेवा .
७) आजकाल जाळीदार लॉक बॅगही बाजारात सहज मिळतात, पण त्यात भाज्या थेट ठेवण्याऐवजी कागदाच्या टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा.
८) फ्रिजमध्ये हिरव्या भाजा ठेवायला जागा नसेल तर पालक उकळवून त्याची पेस्ट बनवू शकता. याच्या मदतीने तुम्ही पालक सूप, पालक-पनीर, बटाटा-पालक असे अनेक पदार्थ बनवू शकता.
९) सलादची पानं हवाबंद डब्यात ठेवा आणि रेफ्रिजरेटरच्या थंड भागात ठेवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते ट्रान्सपरंट फॉइलमध्येही गुंडाळून फ्रीजमध्येही ठेवू शकता.