How To Make A Normal Iron Kadai Non-Stick: स्वयंपाक करताना नेहमी भांड्याला भाजी चिकटते. विशेषत: जेव्हा तुम्ही भातापासून कोणाताही पदार्थ तयार करता तेव्हा. जसे फ्राईड राईस, किंवा पुलाव इ. जर तुमच्याकडे नॉनस्टिक कढई नसेल तर तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू शकतो. पण तुम्हाला माहितीये का? एक स्मार्ट ट्रिकसह तुम्ही कोणत्याही नॉर्मल कढईला नॉन स्टिक कढई बनवू शकता. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी ही ट्रिक इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. शेफ कुणाल यांनी एक व्हिडीओ शेअर करून ही ट्रिक कशी वापरावी हे सांगितले आहे.


शेफ कुणास कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, सामान्य कढईला नॉन स्टिक बनवण्याची सोपी टीप. व्हिडीओमध्ये शेफ कुणाल सांगतात की, “नेहमी लोक या गोष्टीची तक्रार करतात की, भात फ्राय करताना तो कढईच्या तळाला चिकटतो, अशा स्थितीमध्ये तुम्ही नॉन स्टिक कढई नसेल तर काळजी करू नका. तुम्ही साध्या कढईला नॉनस्टिक बनवू शकता.”

हेही वाचा – फ्रिजरमध्ये बर्फ झालाय? मग फक्त बटाटा वापरा! कोणतेही भांडे चिकटून बसणार नाही…पाहा Viral Video

हेही वाचा – नाश्ता किंवा जेवणाची योग्य वेळ कोणती? वजन कमी करण्यासाठी काय करावे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साध्या कढईला असे बनवा नॉनस्टिक

शेफ कुणाल यांनी सांगितले की, ही सोपी ट्रिक वापरताना सुरुवातील एक कढई गॅसवर ठेवून गरम करा. इतकी गरम करा की लोखंडी कढई इंद्रधनुष्याच्या रंगाची दिसू लागेल. आता कढईत तेल टाकून गरम होऊ द्या. जेव्हा तेल पूर्ण पण गरम होईल आणि धूर येऊ लागेल तेव्हा कापडी रुमालाने तेल पूर्ण कढईला लावून घ्या. आता तुम्हाला ही कढई नॉन स्टिकसारखी गरम करावी लागेल. तुम्हाला इच्छा असल्यास तुम्ही त्यात भात करू शकता किंवा दुसरा कोणताही पदार्थ. पण ही ट्रिक तुम्हाला कोणताही पदार्थ तयार करण्यापूर्वी नेहमी वापरावी लागेल.