हल्ली आपल्याकडे पाश्चिमात्य पदार्थ खाण्याचे प्रमाण आणि आवड वाढत चाललेली आहे. हे पदार्थ उपलब्ध करून देणारे देशात असे अनेक रेस्टॉरंट्स सुरूही करण्यात आलेले आहेत. आणि त्याला खवय्यांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे. गेल्या दीड वर्षात करोना संकटामुळे सर्व महाग झाले. पण खवय्यांनी यावरही मार्ग शोधून काढला. गेल्या वर्षीपासून जे पदार्थ आपण हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये जाऊन खायचो असे नवनवीन पदार्थ लोकांनी घरीच बनवायला सुरुवात केली. मग त्यात बिस्किट्सपासून बनवलेला केक असो किंवा पोळीपासून बनवलेला पिझ्झा असो. लोकांनी आपली खाण्याची आवड काही सोडली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज आपण घरी बनवण्यासाठी सोपी अशी पास्ता रेसिपी बघणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पास्ता बनवायचा म्हणजे त्यासाठी बाजारातून पास्ता आणावा लागेल तर तसं मुळीच नाही. आता तुम्हाला घरच्या घरी पास्ता रेसिपी बनवायची असेल तर तुमच्या घरी पास्ता असायलाच हवा असं नाही. कारण तुम्ही घरातल्याच वस्तूपासून पास्ता बनवू शकणार आहात आणि ही वस्तू म्हणजे पापड. हो, बरोबर वाचलं तुम्ही. आता तुम्ही घरी सहज उपलब्ध असणाऱ्या पापडपासून पास्ता बनवू शकता.

काय आहे कृती?

शेफ सप्रांश गोयला यांनी काही दिवसांपूर्वीच पापडाचा वापर करून पास्ता कसा बनवायचा याचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. यानुसार पापड पास्ता स्ट्रिप्सच्या आकारात कापून घ्यावे. नंतर त्यांनी हे स्ट्रिप्स पाण्यात उकळून घ्यायचे. यात थोडं तेल सुद्धा टाकावं. स्ट्रिप्स शिजल्यावर त्या पाण्यातून काढून निथळण्यास ठेवाव्यात. पापड आधीच फार पातळ असल्यामुळे ते जास्त वेळ शिजवत ठेवू नये.

पापड शिजल्यावर एका खोलगट तव्यात थोडं तेल गरम करावं. त्यात थोडं लसूण बारीक चिरून घालायचं. त्यानंतर त्यात आपल्या घरातील काही मसाले घालून पापडाच्या शिजलेल्या स्ट्रिप्स टाकाव्यात. शेवटी या पास्तामध्ये काही हर्ब्स आणि सिजनिंग घालावी.

“मी स्वतः हिम्मत करून ही रेसिपी दुपारच्या जेवणासाठी बनवली. मला वाटलं हा प्रयत्न अपयशी ठरेल पण हा पदार्थ खूपच चविष्ठ झालेला आहे.”, असं त्यांनी आपल्या व्हिडिओ शेअर करताना म्हट्लं आहे. तसेच, “पास्ताच्या या देशी व्हर्जनमध्ये २५ ते ३० रुपयात बनणारा हा पास्ता पाप्पार्देले पास्ताची सर्वात स्वस्त अशी कॉपी आहे.” असंही त्यांनी म्हटलं आहे.


तुम्ही पण बनवून बघा हा पापडपासून बनवलेला देसी पास्ता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make gluten free pasta from papad recipe by chef saransh goila pvp
First published on: 10-08-2021 at 16:35 IST