How To Make Guava Leaf Tea To Manage Blood Sugar: मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित झपाट्याने पसरणारा आजार आहे; जो वेळीच नियंत्रित केला नाही, तर हृदय, किडनी, डोळे व नसा यांना गंभीर नुकसान पोहोचवू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगभरात ८३० दशलक्षांहून अधिक लोक सध्या मधुमेहाने ग्रस्त आहेत. आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघ (IDF) पुढे अहवाल देतो की, भारत जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२४ पर्यंत अंदाजे ८९.८ दशलक्ष प्रौढांना याचा त्रास होत होता. ही संख्या २०५० पर्यंत १५६.७ दशलक्षांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यात आणखी चिंताजनक बनवणारी गोष्ट म्हणजे टाईप २ मधुमेह व्यवस्थापित करण्यायोग्य आहे; परंतु तो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही आणि तुमची जीवनशैली यात मोठी भूमिका बजावते. खराब आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, ताणतणाव व अनियमित झोप हे प्रमुख घटक यासाठी कारणीभूत आहेत. औषधे घेणे महत्त्वाचे असले तरी दीर्घकालीन मधुमेह व्यवस्थापन बहुतेकदा शाश्वत जीवनशैलीतील निवडी आणि सजग आहार यांवर अवलंबून असते.

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी औषधे उपलब्ध असली तरी बरेच लोक नैसर्गिक आणि घरगुती उपचारांद्वारेदेखील ते नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. येथेच पेरूच्या पानांच्या चहासारखे पारंपरिक उपाय वापरले जातात. पेरूच्या पानांमध्ये रक्तातील साखरेचे नियमन करण्यास मदत करणारे गुणधर्म आहेत. चला त्याचे फायदे जाणून घेऊ…

पेरूची पाने पोषक घटकांनी परिपूर्ण असतात. पेरूची पाने फ्लेवोनॉइड्स, टॅनिन व पॉलिसेकेराइड्स यांनी समृद्ध असतात. ही संयुगे त्यांच्या अँटिऑक्सिडंट्स, दाहक-विरोधी व मधुमेहविरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जातात.

मॉलिक्यूल्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, पेरूच्या पानांपासून काढलेले पॉलिसेकेराइड्स मधुमेहींमध्ये रक्तातील साखर, एकूण कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड पातळी लक्षणीयरीत्या कमी करू शकतात. त्याच अभ्यासात अँटिऑक्सिडंट्स एंझाइमची क्रिया सुधारली आणि यकृत, मूत्रपिंड व स्वादुपिंडातील गुंतागुंत कमी झाल्याचेदेखील आढळून आले.

मधुमेहींच्या आहारात पेरूची पाने कशी समाविष्ट करावीत?

फळ सामान्यतः कच्चे आणि ताजे खाल्ले जाते; परंतु त्याची पाने चहामध्ये वापरता येतात आणि तुमच्या दैनंदिन आरोग्य दिनचर्येत त्यांना समाविष्ट करता येते.

पेरूच्या पानांच्या चहासाठी कृती : ६-७ ताजी पेरूची पाने पूर्णपणे स्वच्छ करा. एका पॅनमध्ये १.५ कप पाणी घ्या. हे पाणी सुमारे १० मिनिटे उकळवा. त्यानंतर चहा गाळून घ्या आणि गरम प्या.

तुम्ही दररोज पेरूच्या पानांचा चहा पिऊ शकता का?

हो, तुमच्या दैनंदिन आहारात एक कप पेरूच्या पानांचा चहा सुरक्षितपणे समाविष्ट केला जाऊ शकतो. शक्यतो जेवणानंतर. परंतु, कोणत्याही हर्बल उपायाप्रमाणे संयम राखणे महत्त्वाचे आहे. कारण- जास्त सेवन केल्याने पचनाच्या सौम्य समस्या उद्भवू शकतात. तुमच्या दिनचर्येत पेरूच्या पानांचा चहा समाविष्ट करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे; विशेषतः जर तुम्ही कोणत्याही प्रकारची औषधे घेत असाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अन् डायबिटीज होण्याच्या वाटेवर आहात? ही १० लक्षणं देतात इशारा

  • वारंवार लघवी होणे
  • जास्त तहान
  • वाढलेली भूक
  • थकवा
  • धूसर दृष्टी
  • हळूहळू बऱ्या होणाऱ्या जखमा
  • वजन कमी होणे
  • वारंवार होणारे संक्रमण
  • हात/पायांमध्ये मुंग्या येणे किंवा सुन्न होणे
  • चिडचिडेपणा किंवा मूड स्विंग्स