Natural and chemical-free lipstick DIY : आपले ओठ नैसर्गिकरीत्या गुलाबी आणि मुलायम असावेत, असे प्रत्येक तरुण-तरुणीला वाटते. मात्र, ओठांवर लावल्या जाणाऱ्या लिपस्टिक, लीप बाम यांसारख्या उत्पादनांमध्ये रासायनिक घटकांचा उपयोग केलेला असतो. त्यामुळे अनेकदा अशा उत्पादनांच्या वापरानंतर तुमच्या ओठांची साले निघणे, ओठांचे कोपरे हळूहळू काळे पडणे असे त्रास उदभवण्याची शक्यता असते.

परंतु, तुम्हाला माहीत आहे का की, घरी उपलब्ध असणाऱ्या आणि अतिशय सामान्य असलेल्या या एका खास गोष्टीपासून आपल्याला नैसर्गिक आणि रसायनमुक्त लिपस्टिक किंवा लीप बाम अगदी सहज बनविता येऊ शकतो. कोशिंबीर बनविण्यासाठी आपण जेव्हा बीट वा बीटरूट कापत असतो तेव्हा आपली बोटे गुलाबी-लालसर रंगाने रंगून जातात. आपण आता याच बीटाचा उपयोग करून, घरगुती लिपस्टिक कशी बनवायची ते पाहणार आहोत.

mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी
Breakfast Recipe
Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण

हेही वाचा : Beauty tips : तूप, बदाम अन्….; काय आहे घरगुती काजळ बनवण्याची पारंपरिक ट्रिक, जाणून घ्या

घरगुती लिपस्टिक कशी बनवावी? [How to make lipstick at home?]

साहित्य

बीट
खोबरेल किंवा बदामाचे तेल
बीजवॅक्स [Beeswax / मेण]
शे बटर/कोको बटर
इसेन्शियल ऑइल
सुती कापड

हेही वाचा : Skin care : आला आला उन्हाळा; त्वचेला ‘टॅनिंगपासून’ कसे बरे सांभाळाल? पाहा हा घरगुती फेसपॅक

कृती

 • सर्वप्रथम मध्यम आकाराचे बीट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे. त्यावर लागलेली माती व्यवस्थित काढून घ्यावी.
 • बीट स्लायसरच्या मदतीने सोलून अथवा सुरीने बारीक चिरून घ्यावे.
 • चिरलेले तुकडे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊन, त्याची बारीक पेस्ट बनवून घ्या. गरज वाटल्यास, त्यात थोडेसे पाणी घालावे.
 • आता एका सुती कापडावर तयार केलेल्या बीटाची पेस्ट घालून घेऊन, बीटातील सर्व रस काढून घ्यावा.
 • हा रस एका नॉनस्टिक पातेल्यामध्ये घेऊन, तो मंद आचेवर गरम करण्यास ठेवावा.
 • रस गरम होत असताना, त्यामध्ये खोबरेल /बदामाचे तेल, शे बटर वा कोको बटर, बीजवॅक्स घालून, सर्व मिश्रण ढवळत राहा.
 • मंद आचेवर सर्व घटक वितळून बीटाच्या रसात एकजीव होईपर्यंत मिश्रण सतत ढवळत, शिजवून घ्यावे.
 • आता सगळे पदार्थ मिश्रणात व्यवस्थित मिसळल्यानंतर पातेल्याखालील गॅस बंद करा.
 • लिपस्टिकसाठी तयार झालेले हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या.
 • तुम्ही इसेन्शियल ऑइलचा वापर करीत असल्यास, त्याचे काही थेंब या गार होणाऱ्या मिश्रणात घालून मिश्रण ढवळून घ्या.
 • आता आपल्या नैसर्गिक लिपस्टिकचे मिश्रण एका लहानशा डबीत किंवा लिपस्टिकच्या स्वच्छ साच्यामध्ये ओतून घ्या.
 • मिश्रण पूर्णतः गार आणि घट्ट झाल्यानंतर त्याचा वापर करावा.
 • ही पाहा तयार झाली आपली घरगुती, नैसर्गिक व रसायनमुक्त लिपस्टिक.

[टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.]