कांद्याशिवाय स्वयंपाक करणे अनेकांसाठी अवघड असते. साधारपणे डाळ, भाजी ते सॅलडसह अनेक पदार्थांसाठी प्रत्येक घरात दररोज कांदे वापरले जातात. पण, काही दिवसांपासून भारतातील अनेक राज्यांमध्ये कांद्याचे भाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यात महाराष्ट्रातही कांद्याच्या भाववाढीवरून राजकारण सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याचे भावही वाढू शकतात, अशा बातम्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना भाववाढीच्या आधीच कांद्याची साठवण करणे फायदेशीर ठरू शकते.

आम्ही तुम्हाला कांदे दीर्घ काळ ताजे टवटवीत ठेवण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगणार आहोत. तुमच्या सोईनुसार त्यापैकी कोणताही एक उपाय वापरून तुम्ही पैसे वाचवू शकता. पण लक्षात ठेवा- कांद्याची जास्त प्रमाणात खरेदी करू नका. कारण- त्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते.

कांदा ठेवा टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून

जास्त मेहनत न करता, तुम्ही कांदे अनेक महिने साठवून ठेवू शकता. त्यासाठी कांदा टिश्यू पेपरमध्ये अलगद गुंडाळून कापड किंवा पिशवीत आणि थंड ठिकाणी ठेवा. पण याचा अर्थ कांदे फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही.

कांदा कापून फ्रिजमध्ये ठेवा

कांदा कापल्यानंतर तुम्ही तो रेफ्रिजरेटरमध्ये सुमारे १५-२० दिवस ते तीन महिने ठेवू शकता. त्यासाठी कांद्याचे लहान तुकडे करा. नंतर ते ५ ते १० मिनिटे हवेत उघडे ठेवा. त्यानंतर पॅकबंद डब्यात ठेवून ते फ्रिजमध्ये स्टोअर करा.

… तर कांदे टिकतील सहा महिने

जर तुम्हाला सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ कांदा साठवायचा असेल, तर तुम्ही ते तळून ठेवू शकता. त्यासाठी आवश्यकतेनुसार कांद्याचे मध्यम काप करावेत. नंतर ते तपकिरी होईपर्यंत तेलात तळून घ्या आणि हवाबंद डब्यात ठेवा. लक्षात ठेवा ओलावा किंवा जास्त प्रकाश आणि उष्णता असलेल्या जागेवर कांदा स्टोअर करू नका.

कांदा दीर्घ काळ साठवण्यासाठी ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष …

१) कांदा केव्हाही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवू नका.

२) फ्रिजमध्ये सालासह कांदा ठेवू नका.

३) साठवणीसाठी कोंब आलेले कांदे घेऊ नका.

४) लवकर खराब होतील, असे वाटणारे कांदे लवकरात लवकर वापरण्याचा प्रयत्न करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४) कांदे स्टोअर करण्यासाठी नेहमी मोठे आणि कोरडी साल असलेले कांदे निवडा.