प्रत्येक घरांमध्ये आंघोळीपासून कपडे धुण्यापर्यंत साबणाचा वापर केला जातो. पण साबण सतत वापरून त्याचा शेवटी अगदी लहान तुकडा राहतो, तेव्हा लोक तो साबणाचा तुकडा कचऱ्यामध्ये टाकून देतात, बहुतेकजण असेच करतात. पण तुम्ही देखील ही चुक करत असाल तर आजच थांबा! कारण आंघोळीच्या साबणाच्या उरलेल्या तुकड्याचा तुम्ही पुन्हा चांगल्याप्रकारे वापर करु शकता, तो कशाप्रकारे करायचा जाणून घेऊ….

हात धुण्यासाठी हँडवॉश बनवा

आंघोळीच्या उरलेल्या साबणाच्या तुकड्यापासून तुम्ही हात धुण्यासाठी हँडवॉश बनवू शकता. यासाठी तुम्हाला भरपूर साबणाचे तुकडे लागतील. तुमच्याकडे साबणाचे असे १० -१२ तुकडे जमा झाल्यावर ते चांगले कुस्करून घ्या. यानंतर पाण्यात टाकून ते नीट विरघळून घ्या. सुगंधासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे सुगंध तेल देखील घालू शकता. आता ते स्प्रे बाटलीत स्टोर करा आणि हात धुण्यासाठी वापरा.

शूजच्या घाणेरड्या वासापासून मुक्त मिळवण्यासाठी

घामामुळे कधी कधी शूजमधून भयानक घाणेरडा वास येऊ लागतो. अशा स्थितीत तुम्ही साबणाचे उरलेले तुकडे वापरू शकता. यासाठी साबणाचा तुकडा हलक्या पातळ कापडात गुंडाळा आणि रात्रभर शूजमध्ये ठेवा. यामुळे सकाळी शूजमधील वास कमी होईल.

बागेतील कीटकनाशक म्हणून करा वापर

हवामानातील बदलामुळे विविध वनस्पतींमध्ये किटकांची संख्या वाढू लागते, ज्यामुळे वनस्पतींची वाढ खुंटते. अशा परिस्थितीत तुम्ही आंघोळीच्या साबणाच्या उरलेल्या तुकड्यांपासून कीटकनाशक तयार करू शकता. यासाठी साबणाच्या तुकड्यांचे लिक्विड तयार करुन घ्या. यानंतर त्यात व्हेजिटेबल तेल घाला. आता एका स्प्रे बाटलीत भरा आणि पूर्ण बागेत शिंपडा. काही दिवसांत संपूर्ण बागेत एकही कीटक दिसणार नाही.

कपड्यांमधील कुबट वास घालवण्यासाठी करा वापर

कपाटात खूप दिवसांपासून कपडे भरुन ठेवले असतील तर त्यातून एक विचित्र वास येऊ लागतो. विशेषता पावसाळ्यात कपड्यांमधून ओलसर, कुबट वास येण्याची एक सामान्य समस्या आहे .

अशावेळी कपडे फ्रेश ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या सुगंधीत आंघोळीच्या साबणाचे उरलेले तुकडे सुती कापडात गुंडाळून कपाटाच्या प्रत्येक रॅकवर ठेवू शकता.

शेव्हिंग क्रीम म्हणून करु शकता वापर

शेव्हिंग क्रीमला पर्याय म्हणून तुम्ही उरलेल्या साबणाचा तुकडा वापरु शकता. यामुळे महाग शेव्हिंग क्रीमला हे साबणाचे तुकडे चांगला पर्याय आहे.