अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की काही लोकांना त्यांच्या कोरड्या ओठांमुळे त्रास होतो. फाटलेल्या ओठांमुळे चेहऱ्यावरील सौंदर्यात देखील बाधा येते. ओठ नाजूक असल्यामुळे ओठ लवकर कोरडे देखील होतात. अशा परिस्थितीत तुम्हाला ओठांची मृत त्वचा काढण्यासोबतच काही घरगुती उपायांनीही ओठ मऊ आणि गुलाबी होऊ शकतात. या घरगुती उपायांनी तुम्ही ओठांची काळजी घेऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात…

मऊ व गुलाबी ओठांसाठी या पद्धतींचा अवलंब करा

तुमचे ओठ सुद्धा कोरडे पडत असतील तर याला डिहायड्रेशनची समस्या कारणीभूत असू शकते. याकरिता तुम्ही दिवसातून किमान ८ ते ९ ग्लास पाणी प्यायल्याने ओठांच्या या समस्येपासून तर आराम मिळतोच पण ओठांची कोरडी त्वचाही दूर होऊ शकते.

तुम्ही वेळोवेळी ओठांवर देशी तूप किंवा क्रीम लावा. ही एक जुनी आणि सर्वोत्तम पद्धत आहे. असे केल्याने केवळ ओठ गुलाबी होत नाहीत तर कोरड्या ओठांपासून देखील सुटका मिळू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोबरेल तेलाने ओठांना मसाज केल्यास कोरड्या त्वचेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. डेड स्किनची समस्या दूर करण्यासाठीही खोबरेल तेल उपयुक्त आहे.

Hair care: केसगळतीमुळे त्रस्त आहात? तर कोरफड ठरेल रामबाण उपाय, जाणून घ्या

कोरड्या ओठांच्या समस्येवर कोरफडीचे जेल नियमितपणे लावल्याने ओठ मऊ होतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळाही लावू शकता.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)