नवीन कपडे खरेदी केल्यानंतर मिठाच्या पाण्यात काही वेळ भिजवून धुतले नाही तर प्रत्येकवेळी धुतल्यानंतर त्यांचा रंग निघत राहतो. अशावेळी हे कपडे इतर कपड्यांबरोबर भिजवले तर त्यांना ही रंग लागतो. अनेकदा कपड्यांना इतर कपड्यांचा लागलेला रंग निघत नाही. अशावेळी नवेकोरे कपडे फेकून देण्याशिवाय पर्याय राहत नाही. पण तुमच्याबरोबर असा प्रकार घडत असेल तर खालील उपाय करुन तुम्ही कपड्यांवरील रंगाचे डाग घालवू शकता.
१) कपड्यांवरील रंगाचे डाग घालवण्यासाठी वापरा बेकिंग सोडा
अनेकदा कपड्यांवरील डाग हट्टी काढण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. त्यामुळे रंग लागलेल्या कपड्यांवरही तुम्ही बेकिंग सोडा वापरु शकता. यासाठी एक लिटर पाण्यात एक ते दोन चमचे लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा मिसळा. यानंतर त्यात रंग लागलेले कपडे २० मिनिटे भिजत ठेवा. आता हलक्या हातांनी घासून रंगाचे डाग काढा.
फाटलेले मोजे फेकून देण्याआधी जरा थांबा! ‘या’ पद्धतीने करा पुन्हा वापर
२) अल्कोहोलच्या मदतीने काढा कपड्यांवरील रंगाचे डाग
कपड्यांवरील रंगाचे डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही रबिंग अल्कोहोल देखील वापरू शकता. तुम्हाला ते बाजारात सहज मिळेल.
यासाठी डागावर एक किंवा दोन चमचे रबिंग अल्कोहोल लावा. आता १० मिनिटांनंतर ब्रशच्या साहाय्याने हलके चोळा. असे केल्याने डाग निघून जातील. यानंतर कपडे स्वच्छ पाण्यात धुवा आणि कोरडे करा.
३) ही पद्धत ठरू शकते फायदेशीर
हायड्रोजन पेरोक्साईडच्या मदतीने तुम्ही सहज कपड्यांवरील रंगीत डाग काढू शकता. यामुळे कपड्यांची क्वालिटी देखील खराब होणार नाही.यासाठी प्रथम सुमारे एक लिटर पाणी हलके गरम करावे. नंतर त्यात १ ते २ चमचे हायड्रोजन पेरॉक्साइड मिसळून मिश्रण तयार करा आणि रंग लागलेल्या कपड्यांवर लावून काही वेळ भिजवून ठेवा. पाणी थंड झाल्यावर कपडे ब्रशने घासून स्वच्छ पाण्याने धुवा.