How To Ripen Bananas Quickly In 3 Ways : केळी खाणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे याबद्दल वेगळ सांगण्याची गरज नाही. केळी तुमच्या शरीराला अनेक पोषक घटक देतात. भूक लागल्यावर, वजन वाढवण्यासाठी अगदी उपवासाला देखी केळी आवर्जून खाल्ली जातात. पण, आज काळ बाजारात उपलब्ध असलेली बहुतेक केळी रसायनांनी पिकलेली असतात, जी खाल्ल्यास अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. मग यावर उपाय काय?
तर रसायनयुक्त केळी टाळण्यासाठी, बरेच लोक बाजारातून कच्चे केळे खरेदी करतात आणि घरीच पिकवतात. ही केळी पिकण्यास बराच वेळ लागतो. पण,, काही खास टिप्स वापरून, तुम्ही रसायनांशिवाय घरीच ही केळी सहजपणे पिकवू शकता. यामुळे केळीची गोडवाही व्यवस्थित राहील.
केळी रसायनांशिवाय कशी पिकवायची?
कागदात गुंडाळा – केळी पिकवण्यासाठी कागदी पिशवीत किंवा वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवा. केळीच्या देठामधून इथिलीन वायू बाहेर पडतो; जो केळी पिकवण्यास मदत करतो. कागदी पिशवीत किंवा वर्तमानपत्रात गुंडाळल्याने ती लवकर पिकण्यास मदत होते.
सफरचंदाची मदत घ्या – तुम्ही केळी रसायनांशिवाय घरी सहजपणे पिकवू शकता. फक्त त्यांना अक्रोड किंवा सफरचंदांसह ठेवा. ही दोन्ही फळे इथिलीन वायू सोडतात; जे केळी पिकवण्यास मदत करू शकतात. पण, केळी पिकवण्यासाठी, त्यांना कागदी पिशवीत गुंडाळा. यामुळे वायू आत अडकेल आणि केळी लवकर पिकतील.
तांदळाच्या डब्यात ठेवा – केळी पिकवण्यासाठी तुम्ही त्यांना तांदळाच्या डब्यात सुद्धा ठेवू शकता. पण, तांदळाच्या डब्यात ठेवण्यापूर्वी ती कागदी टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा. यामुळे काही दिवसांतच कच्ची केळी पिकतील आणि चवीवर सुद्धा परिणाम होणार नाही.