हल्ली बहुतांश जण किराणा दुकानातून सामान खरेदी करण्यापेक्षा सुपरमार्केटमधून खरेदी करणे पसंत करतात. किराणा दुकानात आहे त्याच किमतीला वस्तू मिळत असल्याने ग्राहकांना खूप कमी सामान खरेदी करावे लागते; पण सुपरमार्केट्समध्ये अनेक वस्तूंवर ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स मिळतात. यामुळे ग्राहक सुपरमार्केटमध्ये सर्वाधिक पैसे खर्च करतात. यावर अनेक अभ्यासदेखील झाले.
यामुळे सुपरमार्केटमध्ये पाऊल टाकताच तुमचा बँक बॅलन्स कमी होणार असेच समजा, कारण आपण नकळत अनेक अनावश्यक गोष्टीदेखील खरेदी करतो. तुम्हाला नाही तर अनेकांना असा अनुभव आला आहे. पण, या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आणि कमी पैशात जास्त वस्तू खरेदी करण्यासाठी आम्ही तुम्हाला शॉपिंगचे काही सुपर सिक्रेट्स सांगणार आहोत, ज्या फॉलो करून तुम्ही शॉपिंगचा चांगला आनंद घेऊ शकता.
१) शॉपिंगला जाण्यापूर्वी वस्तूंची एक लिस्ट बनवा
सुपरमार्केट ही अशी संकल्पना आहे, जिथे तुम्ही येताना ठरवून येता की एवढ्याच वस्तू घ्यायच्या, पण बाहेर पडताना अनावश्यकही वस्तू भरून नेता.
यामुळे येताना खिशात आणलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे खर्च होतात. या सर्व गोष्टी टाळण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे खरेदीला जाण्यापूर्वी तुम्ही वस्तूंची एक लिस्ट तयार करा आणि लिस्टनुसारच वस्तू खरेदी करा.
२) सिंगल यूज वस्तूंची खरेदी करू नका
सुपरमार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कमीत कमी खर्चात शॉपिंग करायची असेल तर अनेक वेळा वापरता येणार्या वस्तूंची खरेदी करा. यामुळे तुम्ही एका वस्तूचा मल्टीपल यूज करू शकता, यामुळे पैशांची मोठी बचत होते.
३) सर्वात आधी आवश्यक वस्तू खरेदी करा
सुपरमार्केटमध्ये गेल्या गेल्या आधी तुम्हाला सर्वात आवश्यक वाटणाऱ्या गोष्टी खरेदी करा. सहसा प्रत्येकासोबत असे घडते की, सुपरमार्केटमध्ये पोहोचताच आपण अशा अनेक वस्तू घेतो, ज्यांची आपल्याला खरोखर गरज नसते. ज्यामुळे काही आवश्यक गोष्ट खरेदी करणे राहून जाते. जर तुम्हाला टॉयलेट पेपर, किचन पेपर या गोष्टींची खरंच इतकी गरज नसेल, तर त्यावर अनावश्यक पैसे खर्च करू नका.
४) वस्तू बल्कमध्ये खरेदी करा
बल्कमध्ये वस्तू खरेदी केल्याने तुमची मेहनत आणि खर्च दोन्ही कमी होतो. त्यामुळे सुपरमार्केटमधून वस्तू खरेदी करता तेव्हा एकाच वेळी अधिक वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करा. कारण यामुळे तुम्हाला अनेक ऑफर्सचादेखील फायदा मिळेल. पण अशा वस्तू खरेदी करा, ज्या आरामात सहा ते सात महिने साठवून वापरू शकता.
५) शॉपिंग करताना या गोष्टींची घ्या काळजी
१) शॉपिंगसाठी जाताना नेहमी मोठ्या कॅरी बॅग घेऊन जा.
२) रिकाम्या पोटी शॉपिंगसाठी बाहेर पडू नका, नाहीतर वाचलेले पैसे बाहेर खाण्यावर खर्च होतील.
३) मेंबरशिप असल्यास तुम्हाला अनेक प्रोडक्टवर अधिक डिस्काउंट मिळू शकतो.
४) कॅशबॅक ऑफर चेक करा.
५) शक्य असल्यास मुलांना बरोबर न घेता खरेदीला जा, कारण ते अत्यावश्यक नसलेल्या वस्तूही खरेदी करण्याचा हट्ट करतात.