scorecardresearch

Health: योनीत खाज येण्याची ही असू शकतात कारणं, उपचार कसे करावे ? जाणून घ्या

योनीतून खाज सुटणे ही एक अशी समस्या आहे ज्यामुळे स्त्रिया अनेकदा बळी पडतात. योनिमार्गात खाज येण्याची मुख्य कारणे म्हणजे हार्मोनल बदल, गर्भधारणा, रजोनिवृत्ती यामुळेही योनीमार्गावर खाज सुटण्याची समस्या निर्माण होते.

itching
(Photo : Freepik )

योनीतून खाज सुटणे ही एक अशी समस्या आहे ज्यामुळे स्त्रिया अनेकदा बळी पडतात. योनिमार्गात खाज येण्याची मुख्य कारणे म्हणजे हार्मोनल बदल, गर्भधारणा, रजोनिवृत्ती यामुळेही योनीमार्गावर खाज सुटण्याची समस्या निर्माण होते. योनिमार्गातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या कमी झाल्यामुळे योनीतून खाज सुटते, असे अनेक संशोधनांतून समोर आले आहे. चांगले बॅक्टेरिया कमी झाल्यामुळे योनिमार्गात संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो आणि योनीला खाज सुटू शकते.
योनिमार्गात खाज सुटणे ही समस्या अनेकदा सुगंधी साबण वापरल्याने होते. योनीतून खाज सुटणे हा एक यीस्ट संसर्ग आहे ज्यामुळे योनीभोवती खाज येते. पण ही खाज एक्जिमा किंवा इतर कोणत्याही त्वचेच्या संसर्गामुळे देखील असू शकते.
योनीतून खाज येण्याची इतर कारणे: योनीमार्गावर खाज येण्याची इतरही अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ घाणेरडे सॅनिटरी नॅपकिन वापरणे, साबणाचा जास्त वापर करणे, घट्ट पँटीज वापरणे आणि  प्यूबिक एरियामध्ये  वॅक्सिंग करणे यामुळे देखील या समस्येचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही योनीमार्गात खाज येण्याने त्रास होत असेल तर आजपासूनच उपचार सुरू करा. यावर उपचार कसे करावे ते जाणून घेऊया.

  • योनीतून होणारी खाज कमी करायची असेल तर योनीमार्गाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. खाज दूर करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ मिसळून योनीमार्ग स्वच्छ करा, खाज सुटण्यास आराम मिळेल.
  • योनीत होणारी खाज दूर करण्यासाठी तुम्ही बर्फाच्या पॅकने कॉम्प्रेस करू शकता. यासाठी एका टॉवेलमध्ये बर्फाचा तुकडा ठेवा आणि त्याने खाज येणाऱ्या जागेवर शेक द्या. त्वरित आराम मिळेल.
  • कोरफडीच्या जेलने योनीच्या खाजवर उपचार करता येईल. कोरफडीमध्ये अँटीबॅक्टीरियल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे खाज सुटण्यापासून लवकर आराम देतात.
  • अॅपल सायडर व्हिनेगर योनीच्या खाज सुटण्यासाठी खूप प्रभावी आहे. अँटीफंगल गुणधर्मांनी समृद्ध अॅपल व्हिनेगर कोमट पाण्यात मिसळून वापरता येते. दिवसातून दोनदा या पाण्याने योनी स्वच्छ करा, खाज सुटण्यापासून आराम मिळेल. 
  • योनीतून खाज सुटत असेल तर कॉटन पॅन्टी घाला. कॉटन पँटीज घातल्याने त्वचेच्या छिद्रांना श्वास घेण्यास मदत होईल आणि घाम देखील सुटू शकेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2022 at 23:10 IST
ताज्या बातम्या