How To Repair Water Tap Leaking : अनेकदा बाथरूम, बेसिनचा नळ बंद केल्यावर पाण्याचे थेंब सतत टपकत असतात. त्यामुळे सतत पाणी टपकण्याचा आवाज ऐकून त्रास होतो आणि त्याचबरोबर पाणीही वाया जाते. ही समस्या सोडविण्यासाठी अनेकदा तुम्ही प्लंबरला बोलावता, मग तो दुरुस्त करण्यासाठी खूप पैसे घेतो. पण, जर तुम्हाला हा खर्च वाचवायचा असेल, तर ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…
आम्ही तुम्हाला नळातून गळणारे पाणी कसे थांबवायचे यासाठी एक सोपी टीप सांगणार आहोत. या टीपच्या मदतीने तुमच्या गळणाऱ्या नळाची समस्या काही मिनिटांत दूर होईल…
१. नळाचा वॉशर बदला – नळाच्या आतमध्ये एक लहान रबर वॉशर असतो; जो पाण्याचा प्रवाह थांबवतो. जर त्याचे नुकसान झाले असेल, तर नळातून पाणी गळायला लागते. अशा परिस्थितीत तुम्ही वॉशर बदलण्याची गरज आहे.
२.अशा प्रकारे करा दुरुस्ती – सगळ्यात पहिल्यांदा नळ बंद करा. त्यानंतर स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने नळाचे हँडल काढा. हँडल काढल्यावर तुम्हाला वॉशर दिसेल. आता तो बदला. तुम्हाला हे वॉशर हार्डवेअरवर सहज सापडेल.
३. नळाचे कंपोनंट्स घट्ट करा – अनेकदा नळाच्या जास्त वापरामुळे त्यातील स्क्रू किंवा नट सैल होऊन जातात. अशा परिस्थितीत पाणी गळण्याची समस्या उद्भवते. तर ही समस्या टाळण्यासाठी नळाचे कंपोनेंट्स घट्ट करा आणि नळ पुन्हा लावून घ्या.
तसेच ‘या’ २ गोष्टी लक्षात ठेवा…
१. नळ उघडल्यावर तो पूर्णपणे स्वच्छ करून घ्या.
२. नळ उघडण्यापूर्वी मुख्य पाणीपुरवठा बंद करा.
या सोप्या टीपचा उपयोग करून तुम्ही तुमच्या घरातील गळणारा नळ सहजपणे दुरुस्त करू शकता आणि पाण्याचा अपव्यय टाळू शकता. तुम्हीही हा उपाय घरी नक्की ट्राय करून बघा आणि काय फरक पडतो ते आम्हाला कमेंटमधून कळवा.