Green Peas Recipes: थंडीच्या सीझनमध्ये बाजारात येणारे हिरवे वाटणे म्हणजेच मटार हे अनेकांचे फेव्हरेट असतात. या मटारपासून असंख्य रेसिपीज करता येतात. अगदी पराठा, भात, मॅगी, कबाब ते तुम्ही म्हणाल त्या रेसिपीमध्ये मटार घालून एक वेगळीच गोडसर आणि फ्रेश चव येते. नुसत्या भाज्यांचा विचार केला तर बटाटा, गाजर, फ्लॉवर, पनीर हवे तेवढे कॉम्बिनेशन मटारसह करता येतात. पण प्रत्येक खास गोष्ट ही मर्यादित असते, तसाच मटारचा सीझन हा थंडीतच असतो. एरवी तुम्हाला बाजारात हिरवे वाटाणे (कडधान्य) मिळतील पण त्याला फ्रेश मटारची चव येत नाही हे आपण सगळेच जाणतो. आणि समजा एखाद्या दुकानात मटार सापडले तर त्यांचे भाव नको तेवढे महाग असतात. पण आता आपण एक अशी सोपी किचन ट्रिक पाहणार आहोत ज्याने आपण वर्षभर फ्रेश मटार खाऊ शकता.

काही गृहिणींनी मटार वर्षभर फ्रीजमध्ये भरून ठेवण्यासाठी स्मार्ट हॅक शेअर केल्या आहेत. आज आपणही अशीच एक हॅक पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला वर्षभर किती मटार लागतील तेवढे तुम्ही घेऊन या आणि खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून पाहा.

१) मटार अत्यंत काळजीपूर्वक सोलून घ्या.
२) आवश्यकतेनुसार पाणी घेऊन ते थोडं कोमट होईपर्यंत गरम करा.
३) या पाण्यात थोडं मीठ व साखर टाका. यामुळे मटारच्या दाण्यांचा रंग फ्रेश राहतो.
४) पाण्याला थोडी उकळ येताच बाहेर काढा व त्वरित थंड पाण्यात घालून ठेवा, यामुळे मटार शिजण्याची प्रक्रिया थांबते.
५) मटारचे दाणे पाण्यातून काही मिनिटांनी बाहेर काढा व एका स्वच्छ सुक्या कपड्यावर वाळत ठेवा.
६) मटारचे दाणे सुकल्यावर ते झिपलॉक बॅगमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा.
७) एक स्मार्ट टीप म्हणजे झिपलॉक बॅग पूर्ण भरू नका बॅगेत थोडी हवा राहू द्या.

हे ही वाचा<< दुधाचा करपलेला टोप, तवा, कुकर 3 मिनिटात करा स्वच्छ; पाहा 3 स्मार्ट किचन टिप्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार मटारच्या सेवनाने कॉलेस्ट्रॉल, वजन, रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच मटार पचनास हलके असल्यास यामुळे अपचन व बद्धकोष्ठ सुद्धा कमी होण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या किचनमध्ये अशा टिप्स वापरात असाल तर आमच्या माध्यमातून इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवा.