Uses of Coconut Peel : नारळ हे प्रत्येक घरात वापराला जातो. देवाला अर्पण करण्यापासून ते जेवणामध्ये चटणीसह अनेक पदार्थांमध्ये वापरतात. आपण नारळ वापरल्यानंतर आपण अनेकदा त्याच्या शेंड्या निरुपयोगी समजून फेकून देतो. पण तुम्हाला माहीत आहे का नारळा इतक्याच नारळाच्या शेंड्या उपयुक्त आहे. आज आम्ही तुम्हाला नारळाच्या शेंड्या वापरण्याचे ७ सर्वोत्तम मार्ग सांगत आहोत जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

नारळाच्या शेंड्या कशा वापराव्या

१. खत तयार करतात
जर तुम्हाला बागकामाची आवड असेल तर नारळाची साल फेकून देण्यापूर्वी हे जाणून घ्या की, तुम्ही त्यांचा वापर कंपोस्ट खत बनवण्यासाठी करू शकता. नारळाच्या शेंड्या बारीक करून खत म्हणून वापरा, यामुळे तुमची झाडे हिरवीगार राहतील.

२. स्क्रबर तयार करा
नारळाच्या सालींचा वापर तुम्ही एक स्क्रबरसारखा करू शकता. अस्वच्छ भांडी साफ करण्यासाठी तुम्ही वापरू शकता.

३ दोरी तयार करू शकता
दोरी बनवण्यासाठी तुम्ही नारळाच्या शेंड्या देखील वापरू शकता. त्यापासून बनवलेली दोरी खूप मजबूत असते.

४.केसांना करा काळे
जर तुमचे केस पांढरे झाले असतील आणि तुम्हाला ते नैसर्गिकरित्या काळे करायचे असतील तर लोखंडी कढईत नारळाची साल जाळून टाका. ही जळलेल्या नारळाच्या शेंड्यांची राख आणि मोहरीच्या तेलात मिसळा आणि लावा, यामुळे तुमचे केस काळे होतील.

५. पिशवी बनवा
पिशव्या बनवण्यासाठी तुम्ही नारळाच्या शेंड्या वापरू शकता. ही इको फ्रेंडली बॅग तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

६. दात चमकवा
पिवळे दात उजळण्यासाठी तुम्ही नारळाच्या शेंड्याचा वापर करू शकता. ही साले जाळून बारीक पावडर बनवा आणि दात स्वच्छ करण्यासाठी वापरा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७. जखमेवर औषध म्हणून वापरा
दुखापत झाल्यास नारळाच्या शेंड्या देखील वापरू शकता. या नारळाच्या शेंड्यांची बारीक पावडर बनवा .आता त्यात थोडी हळद टाकून जखमेवर लावा. तुम्हाला आराम मिळेल.