Smart Hacks: आजकाल बदलत्या ट्रेंडदरम्यान नेहमी कपडे आणि फॅशन एका रात्रीत बदलते. जे कपडे काल चांगले वाटत होत होते ते आज वापरायला नको वाटतात. अशावेळी कित्ये लोक कोणत्याही कपड्याला ४ ते ५वेळा वापरल्यानंतर आपण ते कोणाला तरी देऊन टाकतो किंवा कधी कधी फेकून देतो. पण जुन्या कपड्यांचा पुन्हा वापर करू शकता तेही हटके पद्धतीने. पाहणाऱ्यांना तुमची कलाकुसर नक्की आवडेल. चला तर मग जाणून घेऊ या सोपी ट्रिक

जुने कपड्यांचा कसा करावा पुन्हा वापर

फ्रेम तयार करा
जर तुम्हाला घर सजावायचे असेल तर जुने कपडे वापरू शकता. जर एखाद्या कपड्यावर एखादा सुविचार लिहिलेला असेल तर ती डिझाईन तुम्ही फोटो प्रेमच्या आकारात कापून घ्या आणि ती फ्रेममध्ये लावून भिंतीवर टांगा. पाहून वाटेल की एखाद्या गॅलरीमध्ये खरेदी केलेली फ्रेम आहे.

पॅचवर्क
पॅचवर्कसाठी तुम्ही जुन्या कपड्यांचा वापर करू शकता. कपड्यांना कापून एकत्र शिवून बॅग किंवा जॅकेट किंवा चादर वगैरे बनवू शकता.

असा बनवा ड्रेस
जर तुम्ही जुने कपडे कापून एक नवीन लुक देऊ शकता. मग मोठा टीशर्टपासून मुलांचे कपडे तयार करायचे असो किंवा कोणताही ट्रेंडी ड्रेस. जुन्या कपड्यांना थोडीशी शिलाई मारली की काम झालं.

स्क्रंची बनवू शकता
आजकाल मुली केसांमध्ये रबर बँडच्या जागी स्क्रंची लावण्याला पंसती देतात. ही स्क्रंचीसाठी कापड कापून २ मिनिटामध्ये तयार करू शकता.

उशीमध्ये भरू शकता

उशांमध्ये भरण्यासाठी तुम्ही जुने कपडे वापरू शकता. कापूस ऐवजी जुन्या कपड्यांचा वापर करता येईल. त्यामुळे उशी जास्त मऊ होईल त्यासाठी तुम्ही कपड्यांचे बारीक बारीक तुकडे करू शकता.

गिफ्ट पॅक करण्यासाठी वापरा कपडे
कित्येक जुने कपडे दिसायला फार सुंदर असतात पण समस्या ही असते की ते ट्रेंडच्या बाहेर जातात किंवा शरीराच्या मापाचे नसतात. अशावेळी या कपड्यांचा वापर तुम्ही गिफ्ट रॅप करण्यासाठी करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धाग्याचा करा वापर
जुने कपड्यांचा पातळ धाग्यासारखे कापून घ्या. लांब लांब कापा आणि मग गोलकार बांधून ठेवा. या कपड्यांचा वापर शिलाईसाठी करून तुम्ही काहीतरी नवीन तयार करू शकता.