Silk Saree Washing at Home: सिल्क साड्या ही सर्व महिलांच्या आवडत्या साड्यांपैकी एक आहे. महिला काही खास प्रसंगी सिल्क साड्या घालतात.साडी आणि त्यातही सिल्कची साडी हा महिलांचा विक पॉईंट असतो. अगदी पहिल्या साडीपासून ते लग्नातली साडी, आवडीच्या व्यक्तींनी दिलेली साडी किंवा एखाद्या खास ठिकाणाहून आणलेली साडी असे साडीचे मोठे कलेक्शन महिलांच्या कपाटात असते.मात्र, या साड्यांची काळजीही तितकीच घ्यावी लागते. बऱ्याचदा महिला त्यांच्या सिल्क साड्या स्वच्छ करण्यासाठी बाहेर ड्राय क्लीनिंगला देतात. मात्र यामध्ये खूप पैसे जातात आणि वारंवार बाहेर देणं खर्चिक होतं. मात्र आता टेन्शन घेऊ नका. अवघ्या ५ रुपयांत घरच्या घरी तुम्ही तुमच्या महागड्या लग्नातल्या साड्या सहजपणे स्वच्छ करू शकता.

घरी सिल्क साडी कशी धुवावी?

घरी सिल्क साडी धुताना, प्रथम ती आतून बाहेर करा. आता एका टबमध्ये थंड पाणी भरा आणि त्यात थोडे सौम्य द्रव डिटर्जंट घाला.तुम्ही बेबी शॅम्पू देखील वापरू शकता. आता साडी टबमध्ये बुडवा आणि हलक्या हातांनी ५-१० मिनिटे हलक्या हाताने हलवा. सिल्क साडी धुताना कधीही घासू नका, यामुळे फॅब्रिक खराब होऊ शकते.आता साडी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवा.

एका बाऊलमध्ये कोमट पाणी घ्यायचे. त्यात 1 चमचा खायचा सोडा आणि १ चमचा मीठ घालायचे.

यामध्ये आपण केस धुण्यासाठी वापरत असलेला शाम्पू किंवा लिक्विड साबण घालावा.

हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे.

एका बादलीत जितक्या साड्या ड्रायक्लीन करायच्या आहेत त्या अंदाजे पाणी घ्यावे आणि हे मिश्रण त्यामध्ये घालावे.

या बादलीतील पाण्यात साडी ५ ते १० मिनिटे भिजवावी. यामध्ये साडी घासण्यासाठी आपण साबण किंवा ब्रश यांचा अजिबात वापर करणार नाही.

साडीचा सगळा मळ आणि वास या पाण्यामध्ये निघून जाण्यास मदत होते आणि साडी बाहेर ड्रायक्लीन केल्याप्रमाणे स्वच्छ होते.

सिल्क साडी कशी सुकवावी?

सिल्क साड्या देखील खूप काळजीपूर्वक वाळवाव्या लागतात. धुतल्यानंतर, त्या कधीही चुकूनही पिळू नयेत. पाणी सुकविण्यासाठी तुम्ही त्या कापसाच्या टॉवेलमध्ये गुंडाळू शकता. आता ते सावलीत वाळवा. तीव्र सूर्यप्रकाशात वाळवल्याने त्याचा रंग फिका पडू शकतो.