पूजिते मंगळागौर.. काय मग यंदाच्या श्रावणात मंगळागौर गाजवायला तयार आहात ना? काळ बदलला, आता काय मुली मॉडर्न झाल्या, आजकालच्या मुलींना कुठे पारंपरिक खेळांची हौस.. अशा सगळ्या गैरसमजूतींना छेद देत, हल्ली अनेक “मॉडर्न मुली” मंगळागौरीकडे आकर्षित होत आहेत. अनेक ठिकाणी तर मंगळागौरीच्या खेळांच्या स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात. यंदाच्या श्रावणात तुम्हीही मंगळागौर साजरी करणार असाल तर आतापर्यंत नऊवारी साडी, दागिने, हेअरस्टाईल अशी सगळी तयारी केलेली असेल पण अनेकदा विसरली जाणारी गोष्ट म्हणजे उखाणे. मंगळागौरीचे खेळ म्हणजे उखाण्यांचा आग्रह केलाच जातो. अशात आयत्या वेळी तुमची पंचाईत होऊ नये आणि शंकराच्या पिंडीवर बेल वाहण्यावरच तुमची गाडी अडकू नये म्हणून आम्ही तुमच्यासाठी काही खास ट्रेंडी उखाणे घेऊन आलो आहोत. हे उखाणे जपून ठेवा आणि तुमच्या इतर मैत्रिणींसोबतही आवर्जून शेअर करा.

यंदा श्रावणात २, ९, १६, २३ ऑगस्ट या चार मंगळवारी मंगळागौरी पूजनाचा मुहूर्त आहे, मंगळागौरी देवीचे विधिवत पूजन करून त्या रात्री फुगड्या झिम्मा यांसारखे पारंपरिक खेळ खेळले जाते. या खेळांमध्येच उखाण्याचा आग्रह धरला जातो, चला तर मग पाहू असेच काही हटके उखाणे..

श्रावण महिन्यात सजला मंगळागौरीचा थाट
… रावांचं नाव घ्यायला मी कशाला बघू वाट

मंगळागौरीच्या पूजेला उखाणे घेण्याचा कायदा
.. रावांचं नाव मी घेईन, पण तुमचा काय फायदा
वन.. टू… थ्री… .. रावांचं नाव घेते करा मला फ्री

श्रावण सोमवारी वाहिली जाणारी शिवमूठ म्हणजे नेमकं काय? ‘हा’ मंत्रोच्चार करणे मानले जाते शुभ

मंगळागौरीचे खेळ खेळू, फुगड्या, कोंबडा, पिंगा
.. रावांचं नाव घ्यायला मला कधीही सांगा

नऊवारी नेसले, केसात माळला मोगरा
.. आणि माझ्या जोडीवर साऱ्यांच्या नजरा

हंड्यावर हंडे सात
त्यावर ठेवली परात
परातीत होते सातू
सातूचा केला भात
भातावर वरण, वरणावर तुपाची धार
तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा
जोड्यात हलगडी, हलगाडीत बलगडी
बलगडीत पिंजरा, पिंजर्यात रघु
राघूच्या तोंडी उंबर… रावांचं नाव ऐकलंत ना, मग काढा रुपये शंभर..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर मैत्रिणींनो, रोजच्या दगदगीतून तुमच्यासाठी थोडा वेळ काढा. सजण्याची, मिरवण्याची, खेळण्याची ही सोन्यासारखी संधी दवडू नका. तुम्हाला सगळ्यांना मंगळागौरी व श्रावण मासाच्या शुभेच्छा!