पावसाळा सुरू झाला की डास यायला सुरुवात होते. डास वाढले की त्यामुळे पसरणारे आजार देखील झपाटयाने वाढू लागतात. डासांपासून दूर राहण्यासाठी क्रीम, विविध प्रकारच्या वनस्पती, मच्छरदाणी, आणखी एक गोष्ट ज्याचा सर्वात जास्त वापर केला जातो ती म्हणजे कॉइल. कॉइलच्या वापराने डासांपासून अल्पावधीतच सुटका होते, पण कॉइलचा वापर आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? अनेकांना याबद्दल काहीच माहिती नसते. मात्र, कॉइलपासून निघणारा धुर आरोग्यासाठी हानिकारक असतो.

अशा प्रकारे कॉइल तयार केली जाते

मच्छर कॉइलमध्ये डीडीटी, कार्बन-फॉस्फरस आणि इतर धोकादायक पदार्थ असतात. जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. ते डासांना दूर ठेवण्यासाठी नक्कीच प्रभावी आहेत परंतु त्याच वेळी यामुळे अनेक रोग होण्याची देखील संभावना असते.

( हे ही वाचा: Skin Care: त्वचेवर साबण लावावा की बॉडीवॉश? कशाचा वापर आहे फायदेशीर, जाणून घ्या)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • एका संशोधनात असे आढळून आले आहे की एक कॉइल १०० सिगारेट्सइतकी धोकादायक आहे आणि त्यातून पीएम २.५ धूर निघतो जो खूप जास्त आहे. जरी ते तंबाखूइतका धूर उत्सर्जित करत नाही, परंतु त्यात शरीरासाठी घातक अशी अनेक घटक असतात. मॉस्किटो रिपेलेंट कॉइलमध्ये बेंझो पायरेन्स, बेंजो फ्लोरोइथेन सारखे घटक असतात. त्याच वेळी, या मॉस्किटो किलर कॉइलमुळे तुमच्या शरीराचे आणखी नुकसान होते.
  • कॉइलच्या सततच्या धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. जास्त एक्सपोजरमुळे फुफ्फुसांवरही परिणाम होतो.
  • तज्ज्ञांच्या मते, जर कोणी कॉइलच्या धुरात जास्त वेळ श्वास घेत असेल तर त्या व्यक्तीला दमा होण्याचा धोका वाढतो. त्याच वेळी, ते मुलांसाठी देखील अधिक हानिकारक आहे.
  • कॉइलमधून निघणाऱ्या धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होतोच, पण त्याचा परिणाम त्वचा आणि डोळ्यांवरही होतो. त्यामुळे डोळ्यात जळजळ होणे इत्यादी समस्या निर्माण होतात.