Yoga Video : दररोजच्या धावपळीत आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. जर तुम्ही विवाहित असाल आणि बाळासाठी प्लॅनिंग करत असाल तर काही योगासनांचा तुमच्या दिनचर्येत सहभाग करायला पाहिजे. पुरुष स्त्री दोघांनी करावेत असे सात योगासने आज आपण जाणून घेणार आहोत.
योग अभ्यासक मृणालिनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी बाळासाठी प्लॅन करत असाल तर स्त्री व पुरुष दोघांनी करावा असा योगाभ्यास सांगितला आहे. त्यांनी सात योगासने करून दाखवली आहे. ही योगासने कोणती आहेत आणि त्याचे फायदे कोणते आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

या व्हिडीओत मृणालिनी हे सात योगासने करून दाखवतात आणि त्याचे फायदे सुद्धा सांगतात.
व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –

contraception. Women health,
स्त्री आरोग्य : गर्भनिरोधासाठी ‘सेफ पिरियड’ किती सेफ? 
Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
loksatta Health Special article, nutrition, food, pregnancy period
Health Special: गरोदरपणात किती खावं? काय खावं?

१. उत्कटकोनासन – पेल्विक फ्लोरचे आरोग्य सुधारते. इरेक्टाइल डिसफंक्शनमध्ये फायदेशीर ठरते.

२. बद्धकोनासन – प्रोस्टेट ग्लँडसह ब्लॅडर आणि पोटाच्या आतील सर्व अवयव सक्रिय होतात.

३. पाश्चिमोत्तानासन – मूत्रपिंड, यकृत, गर्भाशय आणि अंडाशय अधिक सक्रिय होतात.

४. अर्धमत्स्येंद्रासन/ वक्रासन – शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते.

५. मार्जरीआसन – ओटीपोटातील अवयवांना उत्तेजित करते. शरीर व मनावरचा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होते.

६. सेतुबंधासन – पेल्विक स्नायुंना बळकट करण्यास मदत होते.

७. अर्धहलासन – ओटीपोटाचे आरोग्य सुधारते.

हेही वाचा : चांगले मित्र आपल्याला मानसिक आरोग्याच्या समस्यांपासून कसे दूर ठेवतात? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….

yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मृणालिनी यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “योग हा वंध्यत्वावरील उपचाराचा यशस्वी घटक असण्याची अनेक कारणे आहेत. जरी ते IUI किंवा IVF सारख्या उपचारांची जागा घेऊ शकत नसले तरी, वंध्यत्व निदानाशी संबंधित मानसिक तणाव, हार्मोनल असंतुलन, पाळीच्या समस्या, इरेक्टाइल डिसफंक्शन यांसारख्या गोष्टींमध्ये मदत होऊन त्याचा बाळासाठी प्रयत्न करत असलेल्या जोडप्यांना फायदा होऊ शकतो

त्यामुळे बाळासाठी प्लॅन करत असाल तर स्त्री व पुरुष दोघांनी सुद्धा योगाभ्यास जरूर केला पाहिजे जेणेकरून –
शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.
स्त्री व पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत होते.
हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते.
शरीराची लवचिकता वाढते व स्नायू बळकट होतात.
ताणतणाव कमी होतो व फ्रेश उत्साही वाटते.

यासाठी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या योगासनांबरोबरच सूर्यनमस्कार व 5 मिनिटे अनुलोम विलोम प्राणायाम चा सराव नियमितपणे करा. प्रत्येक योगासन ३० सेकंद ते ६० सेकंद होल्ड करा. योगासने करताना योगामॅट किंवा सतरंजी वापरा”