दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेकजण आपल्या नवी घरी राहायला गेले असतील किंवा नवीन घर घेऊन ते सजवत असतील. तर आता सुरु होणाऱ्या लग्नाच्या सीजनमुळे हमखास लोक आपलं घर पुन्हा छान सजवतात. अशातच अनेकदा बेडरूममध्ये नक्की कशी सजावट करावी हे समजत नाही. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या सहज करता येतील अशा डेकोरेशनच्या टिप्स सांगणार आहोत. बेडरूम सजवताना, भिंतींचा रंग, खोलीचा आकार, ऋतू आणि तुमची विचारसरणी यावर विचार करत सजावट करावी.

बेड सजवण्यासाठी

बेड सजवण्यासाठी सजावटीच्या उशा, छान सुंदर चादरी बेडच्या आकारानुसार निवडा. बेडशीट नेहमी तुमच्या भिंतीशी जुळणाऱ्या हलक्या रंगात घ्या. जर तुमची खोली लहान असेल तर कधीही मोठ्या प्रिंट्स आणि गडद रंगाच्या शेड्स वापरू नकात.

(हे ही वाचा: ‘या’ चार राशीच्या मुली मानल्या जातात खूप हुशार; करिअरमध्ये गाठतात उंची! )

करा लाइटचा योग्य वापर

बेडरूममध्ये लाइटचा योग्य वापर करणे खूप महत्वाचे आहे. बेडरूममध्ये कधीही जास्त डार्क लाइटचा वापरू नका. पिवळा प्रकाश किंवा मंद लाइटचा वापर बेडरूममध्ये योग्य असतो. बेडरूममध्ये कधीही जास्त वस्तू भरू नका, उलट बेडरूममध्ये कमीत कमी वस्तू ठेवा जेणेकरून बेडरूम नीटनेटके दिसेल.

( हे ही वाचा: ज्या मुलींची नावं ‘या’ अक्षरांनी सुरू होते, त्या व्यावसायिक जीवनात कमावतात खूप नाव! )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेडरूममध्ये ठेवा फर्निचर

बेडरूममध्ये, बेड संपूर्ण जागा व्यापते, अशा परिस्थितीत, आजूबाजूच्या उर्वरित ठिकाणी, आपण साइड टेबल, लहान फर्निचर ठेवू शकता, ज्यावर आपण बसवू शकता. याशिवाय काही सजावटीच्या वस्तू किंवा फुलांची भांडी साइड टेबलवर ठेवा, यामुळे खोली सुंदर दिसेल.