Important Days In June 2023: उन्हाळ्यासह मे महिना देखील संपत आला आहे. मे नंतर मान्सून सीझनमधील पहिल्या महिन्याची म्हणजेच जूनची सुरुवात होणार आहे. भारतामध्ये जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पावसाळ्याला सुरुवात होते. जून हा महिना खूप खास आहे. या महिन्यामध्ये पर्यावरण दिवस, योगा दिवस असे अनेक Special Days चा समावेश होता. जून महिन्याची सुरुवात होण्याआधी आम्ही या महिन्यातील खास दिवसांची माहिती देणार आहोत.

१ जून (World Milk Day)

Healthy Morning Routine
झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ६ गोष्टी; महिन्याभरात कमी होईल वजन, दिसाल स्लिम-ट्रिम!
Gudhi padwa 2024 sade tin muhurta
Gudhi Padwa 2024: साडेतीन मुहूर्त कोणते? गुढीपाडव्याशिवाय ‘या’ अन्य अडीच दिवसांचं महत्त्व काय?
April 2024 Monthly Horoscope in Marathi
३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य
28 March Panchang Sankashti Chaturthi Mesh To Meen
आज संकष्टी चतुर्थीला मेष ते मीनपैकी कुणाच्या कुंडलीत मोदक पेढ्यांचा गोडवा? बाप्पा वर देणार की दंड, वाचा

डेअरी क्षेत्राचे योगदान लोकांना कळावे यासाठी जागतिक दूध दिन साजरा केला जातो. ज्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते, त्यांचे महत्त्व पटवून दिले जाते.

१ जून (Global Day of Parents)

आपल्याला जन्म देणाऱ्या माता-पितांचे सन्मानार्थ जागतिक पालक दिवस हा दिन जगभरात साजरा केला जातो.

२ जून (International Sex Workers’ Day)

फ्रान्समध्ये सेक्स वर्कर्संनी त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला होता. त्या लढ्याची आठवण राहावी यासाठी इंटरनॅशनल सेक्स वर्कर्स डे साजरा केला जातो.

२ जून (Telangana Formation Day)

२०१४ मध्ये आंध्रप्रदेश राज्यातून तेलगंणाची निर्मिती झाली होती. तेलंगणा राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

३ जून (World Bicycle Day)

पर्यावरण पूरक अशा सायकल या वाहनाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी म्हणून जागतिक सायकल दिवस साजरा केला जातो.

४ जून (International Day of Innocent Children Victims of Aggression)

लहान मुलांना सहन कराव्या लागणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक शोषणाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

५ जून (World Environment Day)

संयुक्त राष्ट्र संघाकडे दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. यातून निसर्गाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न लोक करत असतात.

७ जून (World Food Safety Day)

अन्न सुरक्षा याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

८ जून (World Brain Tumour Day)

ब्रेन ट्यूमर या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना हा दिवस समर्पित करण्यात आला आहे. याद्वारे ब्रेन ट्यूमरबद्दल जागरुकता वाढवण्यावर भर दिली जात आहे.

८ जून (World Oceans Day)

सागरांच्या संरक्षणार्थ जागतिक महासागर दिवस साजरा केला जातो. यामार्फत प्लास्टिकचा कमी वापर, समुद्रातील प्रदूषणाचे प्रमाण कमी करणे यावर भर दिला जात आहे.

८ जून (National Best Friend Day)

मैत्रीच्या नात्याला समर्पित हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

१२ जून (World Day Against Child Labour)

बालमजुरी विरुद्ध लढा देण्याच्या उद्देशाने दरवर्षी १२ जून रोजी हा दिवस साजरा केला जातो.

१४ जून (World Blood Donor Day)

रक्तदानाचे महत्त्व लोकांना समजावे, त्याबाबत लोकांमध्ये जागरुकता व्हावी यासाठी जागतिक रक्तदाता दिवस साजरा केला जातो.

१५ जून (World Wind Day)

इंधनाच्या स्त्रोतांच्या ऐवजी वायुच्या गतीचा वापर करणे पर्यावरणासाठी फायदेशीर असते. ही माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

१५ जून (World Elder Abuse Awareness Day)

वयोवृद्ध व्यक्तींच्या हक्कांच्या समर्थन करण्याच्या हेतूने १५ जून रोजी हा दिवस साजरा केला जातो.

१८ जून (Autistic Pride Day)

Autism असलेल्या रुग्णांविषयी जनजागृती करण्यासाठी Autistic Pride Day हा दिवस साजरा केला जातो.

१८ जून (International Picnic Day)

पर्यटन व्यवसायाचे समर्थन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पिकनीक दिवस साजरा केला जातो.

१८ जून (World Father’s Day)

जन्मदात्या वडिलांच्या सन्मानार्थ दरवर्षी १८ जून रोजी वर्ल्ड फाडर्स डे साजरा केला जातो.

२० जून (World Refugee Day)

जगभरातील निर्वासितांनी केलेल्या संघर्षाबाबत जागरुकता वाढवण्यासाठी तसेत विस्थापिताना पाठिंबा दर्शवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

२१ जून (World Music Day)

संगीताला भाषेची मर्यादा नसते. या सुमधूर माध्यमाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

२१ जून (International Yoga Day)

योगाभ्यासाचे ज्ञान जगाभरातील लोकांना मिळावे या उद्देशाने २१ जून रोजी जागतिक योगा दिवस साजरा केला जातो.

(२१ जून रोजी वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो.)

२३ जून (International Olympic Day)

ऑलिम्पिक क्रिडास्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून जगभरात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा केला जातो.

२३ जून (International Widow’s Day)

प्रत्येक विधवा महिलेला तिचे अधिकार आणि हक्क मिळावेत यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ प्रयत्नशील असतो. याचे प्रकटीकरण करण्यासाठी म्हणून २३ जून रोजी या संघटनेद्वारे जागतिक विधवा दिन साजरा केला जातो.

२६ जून (International Day against Drug Abuse and Illicit Trafficking)

अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे नुकसान आणि त्यामुळे समाजावर होणारा परिणाम याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

२६ जून (International Day in Support of Victims of Torture)

अत्याचाराला बळी पडलेल्या पिडीत व्यक्तीच्या संरक्षणार्थ दरवर्षी २६ जून रोजी हा दिवस साजरा केला जातो.

२९ जून (National Statistics Day)

भारतीय संख्याशास्त्राचे जनक प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या जन्मदिनी म्हणजेच २९ जून रोजी भारतात सांख्यिकी दिवस साजरा केला जातो.

३० जून (World Asteroid Day)

लघुग्रह म्हणजेच Asteroid विषयीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी यासाठी जागतिक लघुग्रह दिवस साजरा केला जातो.