‘ओल्ड मंक’ला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवणारे पद्मश्री ब्रिगेडिअर (निवृत्त) कपिल मोहन यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या कपिल मोहन यांनी ६ जानेवारी रोजी गाझियाबाद येथे अंतिम श्वास घेतला. ‘ओल्ड मंक’ला जगभरात पोहचवणाऱ्या कपिल यांच्या निधनाबद्दल समाजमाध्यमांवर अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. भारतीयांच्या पसंतीस उतरलेली रम म्हणून ओल्ड मंक लोकप्रिय आहे. जाणून घ्या कपिल मोहन यांनी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचवलेल्या याच ‘ओल्ड मंक’बद्दलच्या काही गोष्टी

१)
‘ओल्ड मंक’ ही रम भारतामध्ये १९५४ ला पहिल्यांदा बाजारात आली

२)
कमीत कमी सात वर्ष जूनी असते जर सुप्रीम आणि गोल्डन प्रकारातील ‘ओल्ड मंक’ १२ वर्ष जूनी असते

३) सुप्रीम ‘ओल्ड मंक’ ही मंकच्या आकारातील बाटलीमध्ये येते. ज्यामध्ये या मंकचे डोके म्हणजे बाटलीचे झाकण असते.

४)
‘ओल्ड मंक’ जगभरामध्ये विकली जात असली तरी त्यामधील अल्कोहोलचे प्रमाण वेगवेगळे असते. भारतामध्ये ४२.८ टक्के अल्कोहोल असणारी ‘ओल्ड मंक’ विकली जाते जर अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या ‘ओल्ड मंक’मध्ये अल्कोहोलचे प्रमाण ४० टक्के इतके असते.

५)
लष्करासाठी ५० टक्के अल्कोहोल असणारी ‘ओल्ड मंक’ बनवली जाते.

६)
‘ओल्ड मंक’ भारतामधील सर्वाधिक विकली जाणारी रम होती. मात्र २०१३मध्ये सुमारास मॅक्डॉल्ड्स नंबर वनने ओल्ड मंकला मागे टाकत देशातील सर्वाधिक खपाची रम झाली.

७)
‘ओल्ड मंक’ सहा वेगवगेळ्या प्रकारात भारतामध्ये उपलब्ध आहे. ९० एमएल, १८० एमएल, ३७५ एमएल, ५०० एमएल, ७५० एमएल आणि एक लिटर.

८)
भारातातील गाझियाबादमध्ये तयार होणारी ‘ओल्ड मंक’ भारताबरोबरच परदेशातही मोठ्या प्रमाणात विकली जाते. रशिया, अमेरिका, ब्रिटन, जपान, दुबई, इस्टोनिया, फिनलॅण्ड, न्यूझीलंड, केनिया, झांबिया, कॅमेरून, सिंगापूर, मलेशिया आणि कॅनडामध्ये ‘ओल्ड मंक’ला मोठी मागणी आहे.

९)
‘ओल्ड मंक’ने अद्याप कधीही कोणत्याही प्रकारची जाहिरात केलेली नाही. त्यामुळे कंपनीचा जाहिरातीसाठी वेगळे बजेट नसते. बाकी रम विकणाऱ्या कंपन्या सोड्याच्या जाहिरातींच्या माध्यमातून ब्रॅण्डींग करताना ‘ओल्ड मंक’ केवळ शाब्दिक चर्चांमधून लोकांपर्यंत पोहचली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१०)
भारतामध्ये ‘ओल्ड मंक’ वेगवेगळ्या गोष्टींबरोबर एकत्र करुन प्यायली जाते. पाणी, सोडा, सॉफ्ट ड्रिंक्सबरोबर ‘ओल्ड मंक’चे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.