scorecardresearch

Womens Day 2023: महिलांना काय आवडत? ‘वूमन्स डे’ला गिफ्ट द्यायचं तर हे ७ भन्नाट पर्याय बघाच

महिलां दिनानिमित्त अनेक पुरुष आई, मुलगी, बहीण, मैत्रिण, पत्नी अशा आपल्या आयुष्यातील खास महिलांना भेटवस्तू देण्याचा विचार करत असतात.

Women's Day Unique Gift Ideas
महिला दिन २०२३ गिफ्ट आयडिया (Photo : Freepik)

Women’s Day Unique Gift Ideas: महिला सशक्तीकरण, महिला शिक्षण आणि अधिकार प्रदान करण्यासाठी आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी त्याबाबतची जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिलांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचाही प्रयत्न केला जातो. बदलत्या काळानुसार आता महिला दिनाकडे महिलांप्रती आदर भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनही पाहिलं जातं.

त्यामुळे अनेक पुरुष आई, मुलगी, बहीण, मैत्रिण, पत्नी अशा आपल्या आयुष्यातील खास किंवा जवळच्या महिलांना भेटवस्तू देण्याचा विचार करत असतात. पण अनेकदा नेमकं काय गिफ्ट काय घ्यायचं? हा विचार अनेक पुरुषांना सतावत असतो. कारण महिलांना काय आवडत आणि काय नाही याची अनेक पुरुषांना व्यवस्थित माहिती नसते. यासाठीच आज आम्ही तुम्हाला अशा काही गिफ्ट्सच्या कल्पना देणार आहोत. ज्या तुमच्या जवळच्या महिलांना नक्की आवडतील. चला तर जाणून घेऊया ७ भन्नाट गिफ्ट आयडीया.

हेही वाचा- Woman Day 2023 : महिलांनी ‘या’ ५ गंभीर आजारांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा…

महिला दिनासाठीच्या गिफ्ट आयडीया –

हँडबॅग्ज –

अनेक महिलांना हँडबॅग वापरण्याची खूप आवड असते. उत्तम दर्जाच्या, रंगीबेरंगी, हँडबॅग्ज असोत किंवा स्लिंग, टोटे आणि शोल्डर बॅग असोत, मुलींना त्या खरेदी करायला आवडतात. त्यामुळे जरी त्यांच्याकडे आधीचं अशी बॅग असली तरी त्यांना नवीन हँडबॅग मिळाल्याचा आनंदच होईल. त्यामुळे महिला दिनानिमित्त हँडबॅग हा चांगला पर्याय असू शकतो.

कानातल्या रिंग –

झुमके असोत किंवा क्लासिक स्टड्स आणि हुप्स, मुलींना कानातल्या रिंग कधीही आवडतात. शिवाय एक किंवा दोन रिंग देण्याऐवजी तुम्ही ऑनलाइन रिंग ऑर्डर करु शकता जेणेकरून त्यांना सर्व प्रकारच्या रिंग एकत्र मिळतील आणि त्यांच्या आवडीनुसार हवी ती रिंग वापरतील.

हेही वाचा- हेअर स्पा क्रीम घरीच बनवायाची सोपी पद्धत; तुमच्या केसांसाठी फक्त दोन मिनिट काढा

पुस्तके –

वाचनाची आवड असलेल्या महिलांसाठी पुस्ककांपेक्षा चांगली भेट असूच शकत नाही. त्यामुळे तुम्ही ज्यांना गिफ्ट देणार आहात त्यांना वाचनाची आवड असेल तर त्यांच्यासाठी, काल्पनिक, नॉन-फिक्शन, कल्पनारम्य किंवा क्लासिक पुस्तके खरेदी आणि भेट द्या.

इअरबड्स

भेटवस्तू म्हणून टेक गिफ्ट्स देणं सर्वात सोपं कारण तुम्हाला आवडी-निवडी किंवा रंगांवर जास्त लक्ष देण्याची गरज नाही. हे तुमच्या बहिणीसाठी किंवा पत्नीसाठी एक उत्तम भेट असू शकते. तुम्ही तुमच्या बजेटनुसार अशा टेक गिफ्ट देऊ शकता.

स्टेशनरी –

हेही वाचा- international women day 2023 कपडे आणि भूमिका या बाबत कधीच तडजोड केली नाही! – अभिनेत्री यामी गौतम धर

जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी काही खरेदी करत असाल तर तुम्ही तिला स्टेशनरी वस्तू देऊ शकता. आजकाल स्टेशनरी ही केवळ पुस्तके आणि पेन-पेन्सिल बॉक्सपुरती मर्यादित नाही तर त्यात पोस्टकार्ड, विविध प्रकारचे टेप, स्टेपलर, बोर्ड, पत्रके, स्टिकर्स यांचा समावेश असतो.

दागिने –

तुमच्या आईला किंवा पत्नीला कोणत्याही प्रकारचे दागिने भेट देऊ शकता. तुम्ही सोन्याचे, चांदीच्या किंवा हिऱ्याच्या अंगठ्या, कानातले किंवा गळ्यातील चेन असे विविध दागिने भेट देऊ शकता. दागिने हा महिलांचा खूप आवडीचा विषय आहे.

घड्याळ –

स्मार्ट वॉच असो किंवा सामान्य घड्याळ, भेटवस्तू देण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. घड्याळं बहुतेक स्त्रियांची आवडती असतात. पण त्यासाठी त्यांना आवडतीस अशा डिझाईनची घड्याळ घ्या. जर तुम्हाला घड्याळाची रचना समजत नसेल, तर स्मार्टवॉच हा उत्तम पर्याय ठरेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 19:29 IST