म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजे एसआयपी. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे, तुम्ही तुमच्या आवडीच्या म्युच्युअल फंडात तुमच्या सोयीनुसार हप्त्यांमध्ये पैसे जमा करू शकता. येथे एकरकमी गुंतवणूक केली जात नसल्याने अशा प्रकारे गुंतवणूक करताना जोखीम कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. डिजिटलायझेशनच्या युगात गुंतवणुकीसाठी ऑनलाइनही पर्याय उपलब्ध आहे. अशा अनेक एसआयपी आहेत, त्यात तुम्ही दर महिन्याला फक्त एक हजार रुपये गुंतवले तरी तुम्हाला दीर्घ मुदतीत मोठा नफा मिळू शकतो.
म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणुकीत १२ टक्क्यांपर्यंत परतावा आणि दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास १५ ते १६ टक्के परतावा मिळू शकतो, असे मत कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ जितेंद्र सोलंकी यांनी व्यक्त केले आहे. मात्र पण त्यासाठी अट अशी आहे की तुम्ही खूप अभ्यास करून तुमची गुंतवणूक केली पाहिजे. एक हजाराची गुंतवणूक ३४ वर्षांपेक्षा थोडी जास्त असेल, तर मॅच्युरिटीच्यावेळी एसआयपीची रक्कम १ कोटी देखील असू शकते, असंही त्यांनी पुढे सांगितलं. कार्तिक झवेरी सांगतात की, “एखाद्याने आपले उत्पन्न वाढवण्यासोबतच गुंतवणुकीची मर्यादा वाढवली पाहिजे, असे केल्याने तुम्ही कमी वेळेत तुमचे उद्दिष्ट साध्य करू शकाल. उएक कोटीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गुंतवणूकदाराने दरवर्षी गुंतवणुकीच्या रकमेत १५ टक्क्यांनी वाढ केली पाहिजे. जर त्यात यशस्वी झाल्यास २६ वर्षांत हे लक्ष्य पूर्ण करू शकता.”
बँक बुडाल्यास तुमच्या ठेवीतून किती रक्कम परत मिळेल?, जाणून घ्या
जर तुम्हाला २० वर्षात छोटी बचत करून कोट्यधीश व्हायचे असेल तर तुम्ही पाच हजार रुपयांची नियमित गुंतवणूक करू शकता. यानंतर तुम्ही दरवर्षी ५०० रुपयांनी गुंतवणूक वाढवू शकता. २० वर्षांनंतर, तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य सुमारे १ कोटी असेल आणि तुम्हाला गुंतवणुकीत ७५ लाख रुपयांचा नफा मिळेल.