उन्हाळा आला आहे. गरमीपासून आराम मिळण्यासाठी लोक विविध गोष्टींचा अवलंब करतात, त्यातील एक म्हणजे उसाचा रस. उन्हाळ्यात उसाचा रस खूप प्यायला जातो. यामुळे उष्णतेपासून आराम तर मिळतोच शिवाय अनेक आजारांपासून दूर राहण्यासही मदत होते. यकृत, रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. साहजिकच गोड उसाचा रस हा पौष्टिक तसेच आरोग्यासाठी चांगला मानला जातो, पण अनेकदा मनात प्रश्न येतो की मधुमेहाच्या रुग्णांनी उसाचा रस सेवन करावा की नाही? चला तर मग जाणून घेऊया काय बरोबर आहे.

मधुमेहींनी उसाचा रस प्यावा का?

उसाच्या रसात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेही रुग्णांना त्रास होऊ शकतो. मधुमेही रुग्णांनी उसाच्या रसापासून दूर राहावे. उसाचा रस रिफाइंड न करता थेट उसातून काढला जातो, त्यामुळे साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेहामध्ये त्याचा रस सेवन करू नये.

(हे ही वाचा: Diabetes Diet: मधुमेहामध्ये साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आवर्जून खा ‘या’ ३ हिरव्या भाज्या!)

उसाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते, पण साखरेचे प्रमाणही त्यात जास्त असते, त्यामुळे हा रस मधुमेहींसाठी आरोग्यदायी नाही. एक कप (२४० मिली) उसाच्या रसामध्ये ५० ग्रॅम साखर असते, जी १२ चमचे असते. उसाच्या रसात कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) आणि जास्त ग्लायसेमिक लोड (GL) असतो. याचा अर्थ तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर त्याचा परिणाम होतो.

(हे ही वाचा: Diabete: ‘या’ ३ वाईट सवयींचा मधुमेहाच्या रुग्णांना अधिक धोका! रक्तातील साखरेची पातळी सहज बिघडते)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(ही माहिती सामान्य ज्ञानाच्या आधारावर लिहिली आहे. गरजेनुसार तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)