scorecardresearch

Premium

Diabete: ‘या’ ३ वाईट सवयींचा मधुमेहाच्या रुग्णांना अधिक धोका! रक्तातील साखरेची पातळी सहज बिघडते

या तीन वाईटसवयी आपल्या रोजच्या जीवनातील आहे ज्या मधुमेहाच्या रुग्णांना हानी पोहोचवू शकतात.

pixabay-diabetes-1200
तुम्हाला मधुमेह होऊ नये असे वाटत असेल तर आजपासूनच तुमच्या आरोग्याबाबत सावध व्हा. (प्रातिनिधिक फोटो /Pixabay)

मधुमेह हा एक गंभीर आजार आहे ज्याचा संपूर्ण शरीरावर वाईट परिणाम होतो. मधुमेहाच्या स्थितीत शरीरात योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही किंवा शरीर त्याचा वापर करू शकत नाही, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात आणि नंतर इतर अनेक अवयवांचे नुकसान होऊ शकते. इन्सुलिनची कमतरता अनेक पेशी आणि अवयवांवर परिणाम करते. मधुमेहामुळे हृदयविकाराचा झटका, डोळ्यांची कमकुवतपणा आणि किडनीच्या आजारांचा धोका संभवतो. तुम्हाला माहित आहे का या तीन वाईटसवयी आपल्या रोजच्या जीवनातील आहे ज्या मधुमेहाच्या रुग्णांना हानी पोहोचवू शकतात.

अनहेल्दी लाइफस्टाइल

तुमच्या शरीरासाठी नेहमी सक्रिय राहणे खूप महत्वाचे आहे, जे लोक वर्कआउट करत नाहीत त्यांना क्रॉनिक डिजीज होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे दररोज किमान एक तास व्यायाम करा. जर तुम्हाला आधीच मधुमेह असेल तर तुमची दिनचर्या बदला.

thirsty patients
आयुर्वेदाच्या स्मृतीतून : तृष्णा एक व्याधी
why high blood sugar and blood pressure are a risky mix here what you need to check what doctor said read
उच्च रक्तदाबासह मधुमेह असल्यास सावधान! वेळीच काळजी घ्या अन् डॉक्टरांचे ‘हे’ उपाय करा फॉलो
diet for healthy heart
Health Special: हृदयाच्या आरोग्यासाठी काय आहार असावा?
Diabetes Patients
मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात चुकूनही खाऊ नये ‘हे’ पदार्थ; वाढू शकते ब्लड शुगर 

(हे ही वाचा: Diabetes Diet: मधुमेहामध्ये साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आवर्जून खा ‘या’ ३ हिरव्या भाज्या!)

जास्त गोड खाणे

काही लोक जास्त गोड खाण्याची शौकीन असतात, पण या गोडामुळे डायबिटीज झाल्यानंतर जीवाला धोका अनेक पटींनी वाढतो. गोडामुळे कॅलरीज वाढतात ज्या घातक असतात. त्यामुळे गोड पदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत.

(हे ही वाचा: Diabetes Diet: मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात आवर्जून ‘या’ भाज्यांचा करा समावेश!)

लठ्ठपणा

जर तुमचे वजन सतत वाढत असेल तर आजपासूनच व्यायाम सुरू करा कारण वाढत्या लठ्ठपणामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे कठीण होते आणि हळूहळू मधुमेही रुग्णांचे आरोग्य आणखी बिघडू शकते.

(हे ही वाचा: Blood Sugar: मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणती फळे फायदेशीर ठरू शकतात? जाणून घ्या)

तुम्हाला मधुमेह होऊ नये असे वाटत असेल तर आजपासूनच तुमच्या आरोग्याबाबत सावध व्हा. अनहेल्दी लाइफस्टाइल सोडा आणि निरोगी खाण्याला, राहणीमानाला प्राधान्य द्या. मधुमेह टाळण्यासाठी, शरीराच्या एक्टिविटीज आवश्यक आहे, ज्यामुळे कॅलरी बर्‍याच प्रमाणात बर्न होतात.

(या सगळ्या गोष्टींसोबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: These 3 bad habits increase diabetes patients blood sugar levels drop easily ttg

First published on: 21-03-2022 at 13:25 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×