Blanket Cleaning Tips: नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी राज्यातील अनेक भागांत पावसाच्या सरी बरसत आहेत. पावसासह अनेक ठिकाणी थंडीची चाहूल लागण्यासही सुरुवात झाली आहे. थंडीला सुरुवात होताच लोक कपाटात ठेवलेले ब्लँकेट बाहेर काढतात. परंतु, अनेक दिवसांनंतर कपाटातून ब्लँकेट बाहेर येताच त्यातून तीव्र दुर्गंध येऊ लागतो. अशावेळी काही टिप्स फॉलो करून तुम्ही घरी सहजपणे ब्लँकेटमधील दुर्गंध दूर करू शकता, यामुळे तुम्हाला ट्राय क्लीनरनी गरज भासणार नाही.

‘या’ उपायाने ब्लँकेटमधील दुर्गंध जाईल पळून

ब्लँकेट उन्हात ठेवा

ब्लँकेटमधून येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी तुम्ही त्यांना काही काळ सूर्यप्रकाशात ठेवू शकता, यामुळे वास निघून जाईल. खरंतर सूर्यकिरण बुरशी नष्ट करतात, त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा काही तास ब्लँकेट उन्हात ठेवा

कापूर वापरा

ब्लॅंकेटमधील दुर्गंध दूर करण्यासाठी तुम्ही कापूर वापरू शकता. यासाठी तुम्ही ब्लॅंकेटच्या घड्यांमध्ये कापराचे तुकडे टाकू शकता.

कडुलिंबाची पाने आणि कापूर

जर तुमच्या ब्लँकेटमधून कमी प्रमाणात कुबट वास येत असेल तर तुम्ही तो दूर करण्यासाठी कडुलिंबाची पाने आणि कापूर वापरू शकता. जेव्हा तुम्ही ब्लँकेट पुन्हा कपाटात ठेवाल तेव्हा त्यात वाळलेल्या कडुलिंबाची पाने किंवा कापराच्या गोळ्या ठेऊ शकता. कडुलिंबात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे ओलावा आणि बुरशीपासून संरक्षण करतात.

व्हिनेगर

ब्लँकेटमधून येणारा वास दूर करण्यासाठी तुम्ही पांढरा व्हिनेगरदेखील वापरू शकता. यासाठी एका बाटलीमध्ये थोडेसे व्हिनेगर मिसळून द्रावण तयार करा. हे द्रावण ब्लँकेटवर शिंपडा, त्यानंतर काही वेळ ब्लँकेट पंख्याखाली सुकण्यासाठी ठेवा, यामुळे ब्लँकेटमधून येणारा दुर्गंध निघून जाईल.